ADVERTISEMENT

स्टार प्रवाहची ‘काजळमाया’ ठरली अल्पायुषी, अवघ्या दोन महिन्यांत मालिका ऑफ एअर होणार

Star Pravah Kajalmaya serial off air news : स्टार प्रवाहवरील थ्रिलर मालिका काजळमाया अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ११ जानेवारीला अंतिम भाग प्रसारित होणार आहे.
Star Pravah Kajalmaya serial off air news

Star Pravah Kajalmaya serial off air news : मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या टीआरपीसाठी जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या सातत्याने प्रयोग करताना दिसत आहेत. मात्र, काही मालिका अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. स्टार प्रवाहवरील Kajalmaya ही थ्रिलर मालिका त्याच यादीत आता सामील झाली आहे.

२७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झालेली Kajalmaya ही मालिका सुरुवातीपासूनच वेगळ्या धाटणीची कथा घेऊन आली होती. लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर, रुची जैल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. चेटकीण वंश, गूढता आणि थरार यांचा संगम असलेली कथा ही मालिकेची जमेची बाजू मानली जात होती. मात्र, कथानक वेगळं असूनही टीआरपीच्या आकड्यांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही.

सुरुवातीला Kajalmaya ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटला प्रसारित होत होती. टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनीने अवघ्या एका महिन्यात मालिकेची वेळ बदलून रात्री अकरा वाजताचा स्लॉट दिला. तरीही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. उशिराच्या वेळेमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी राहिला आणि त्याचा थेट परिणाम मालिकेच्या भवितव्यावर झाला.

अखेर स्टार प्रवाहने मोठा निर्णय घेत Kajalmaya ही मालिका ऑफ एअर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या मालिकेचा अंतिम भाग ११ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. ‘पर्णिका’ या चिरतारुण्याचं वरदान मिळालेल्या चेटकीणीची कथा, तिचा स्वार्थी आणि निर्दयी स्वभाव, तसेच कनकदत्तासोबतचा संघर्ष या सगळ्यांचा शेवट आता एका निर्णायक टप्प्यावर येणार आहे. “अखेर पर्णिका आणि कनकदत्ताचा कायमचा अंत” अशा कॅप्शनसह स्टार प्रवाहने अंतिम भागाची झलकही शेअर केली आहे.

मालिका इतक्या लवकर संपणार हे कळताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आता कुठे ही मालिका पाहायला सुरुवात केली होती”, “इतकी लवकर बंद का केली?”, “ही मालिका चालू कधी झाली आणि संपली कधी समजलंच नाही” अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, Kajalmaya ऑफ एअर होत असतानाच स्टार प्रवाहवर १९ जानेवारीपासून ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका रात्री ९ वाजताच्या स्लॉटला येणार असून एतशा, अजिंक्य ननावरे आणि माधवी निमकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सध्या ९ वाजता सुरू असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेच्या वेळेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा.. कमळी लक्ष्मी निवास महासंगमात रंगणार मोठा ट्विस्ट, शाळा वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र

एकूणच, वेगळी कथा असूनही Kajalmaya टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आणि त्यामुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हे पण वाचा.. ‘पारू’मधील दामिनी उर्फ श्रृतकीर्ती सावंतची भावनिक पोस्ट; २०२५च्या आठवणी, २०२६साठी नवी उमेद

Star Pravah Kajalmaya serial off air news