ADVERTISEMENT

“दिवाळीचा खरा फराळ! निलेश–भाऊची जोडी आणणार हास्याची आतषबाजी, ‘Dhinchyak Diwali 2025’ मध्ये करणार धम्माल”

star pravah dhinchyak diwali 2025 special show : स्टार प्रवाहवरील ‘Dhinchyak Diwali 2025’ सोहळा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर निलेश साबळे आणि भाऊ कदम पहिल्यांदाच या वाहिनीवर एकत्र झळकणार असून, त्यांची १५ वर्षांची मैत्री आता हास्याच्या फराळात रंगणार आहे.
star pravah dhinchyak diwali 2025 special show

star pravah dhinchyak diwali 2025 special show : दिवाळी म्हटलं की टीव्हीवर रंगणारे स्पेशल कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरतात. यंदा देखील ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक आगळावेगळा सोहळा घेऊन सज्ज झाली आहे. ‘Dhinchyak Diwali 2025’ हा विशेष कार्यक्रम या वर्षीचा TRP हुकमी वाढवणार, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या या सोहळ्याची खरी शान ठरणार आहे महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी विनोदवीर जोडी – डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे दोघे कलाकार पहिल्यांदाच ‘स्टार प्रवाह’वर एकत्र दिसणार आहेत.

कार्यक्रमाविषयी बोलताना निलेश साबळे म्हणाले, “प्रेक्षक खूप दिवसांपासून आम्हाला पुन्हा एकत्र पाहण्याची वाट बघत होते. या दिवाळीत भाऊसोबत ‘Dhinchyak Diwali 2025’ मधून काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र काम करतोय आणि ती जुळलेली केमिस्ट्री या कार्यक्रमातही दिसणार आहे.”

तर भाऊ कदम याबाबत म्हणाले, “स्टार प्रवाहसोबत हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि तोही दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने. निलेशसोबतची मैत्री आजवर नेहमीच रंगली आहे. यावेळीही आम्ही प्रेक्षकांसाठी हास्याचा फराळ घेऊन येणार आहोत. यंदाची दिवाळी खरी अर्थाने ‘ढिंचॅक’ ठरणार आहे.”

हे पण वाचा.. “लग्न नाही, कुटुंब नाही…” नेटकऱ्याच्या मेसेजवर जुई गडकरीची संतप्त प्रतिक्रिया

‘स्टार प्रवाह’ दरवर्षी दिवाळी निमित्ताने मनोरंजनाचा फड सजवते. मालिकांतील लोकप्रिय कलाकार, नृत्याविष्कार, गाणी, हास्य आणि सरप्राइज परफॉर्मन्स यामुळे या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढते. मात्र यंदा ‘Dhinchyak Diwali 2025’ मध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम एकत्र आल्याने प्रेक्षकांचा आनंद दुप्पट होणार आहे.

हा विशेष सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित होणार आहे. दिवाळीचा आनंद दुप्पट करणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आठवणीत नक्कीच कायम राहील, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

हे पण वाचा.. म्हणून मी नकारात्मक भूमिका करतोय; ‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwadची स्पष्ट प्रतिक्रिया

star pravah dhinchyak diwali 2025 special show