‘spirit’ वाद: deepika padukone च्या एक्झिटनंतर sandeep reddy vanga संतप्त वक्तव्य, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची लाट

spirit

sandeep reddy vanga च्या ‘spirit’ चित्रपटातून deepika padukoneची एक्झिट चांगलीच गाजतेय. चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर वादाचा भडका उडवत ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. या सगळ्या वादात ‘स्त्रीवाद‘ ही संज्ञा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

हाय-प्रोफाईल ‘spirit’ या चित्रपटातून अभिनेत्री deepika padukone बाहेर पडल्याच्या काही दिवसांतच, दिग्दर्शक sandeep reddy vanga यांनी सोशल मीडियावर एक तीव्र पोस्ट शेअर करत कोणाचंही नाव न घेता, एक कलाकार आणि त्यांच्या पीआर टीमवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. वंगाच्या या पोस्टनंतर चर्चेचा सूर स्पष्ट आहे—ती व्यक्ती दुसरी कोणी नसून deepika padukone herself असल्याचं बोललं जात आहे.

sandeep reddy vanga लिहिलं, “जेव्हा मी कोणाला कथा सांगतो, तेव्हा मी 100 टक्के विश्वास ठेवतो. आमच्यात एक अलिखित गोपनीयतेचं करार असतो. पण जे तू केलंस, त्यातून तू खरी कोण आहेस हे दिसून आलं… एका तरुण अभिनेत्रीलाच कमी लेखणं आणि माझ्या कथेला झिडकारणं—हेच का तुझं स्त्रीवाद?”

ही पोस्ट केवळ भावना व्यक्त करणारी नव्हती, तर त्यातून sandeep reddy vanga यांचा संताप ठासून जाणवत होता. पुढे त्यांनी हिंदीत लिहिलं, “अगली बार पूरी कहानी बोलना… मुझे ज़रा भी फ़र्क़ नहीं पड़ता. #dirtyPRgames. खुंदक में बिल्ली खंबा नोचे!”

हे पण वाचा..housefull 5 ट्रेलर लाँच चित्रपटात ट्विस्ट; डबल क्लायमॅक्सचा जबरदस्त तडका!<br>

spirit ‘मधून deepika padukone च बाहेर पडण्यामागचं नाट्य

deepika padukone आणि प्रभास यांच्या जोडीतील हा दुसरा पॅन-इंडिया प्रोजेक्ट असणार होता, “Kalki 2898 AD” नंतर. मात्र ‘स्पिरीट’च्या सेटवर सुरूवातीपासूनच काही अडचणी होत्या. एका रिपोर्टनुसार, deepika padukone च्या टीमने तिचं शूटिंग वेळ आठ तासांवरून सहा तासांवर मर्यादित ठेवण्याची मागणी केली होती. तसेच, 100 दिवसांच्या शूटिंग कालावधीनंतर प्रत्येक अतिरिक्त दिवसासाठी वेगळी फी द्यावी, असा अटींचा आग्रह होता.

तसंच, काही अहवालांत असंही नमूद झालं की deepika padukone हिने तेलगू डबिंग करण्यास नकार दिला होता. मात्र यावर अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, दीपिका नुकतीच आई झाल्यामुळे ती काम व कुटुंब यामधील समतोल साधण्याचा प्रयत्न करत होती, असं तिच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं.

प्लॉट लीक आणि नवीन अभिनेत्रीची एन्ट्री

दरम्यान, ‘spirit’च्या प्लॉटविषयी काही माहिती ऑनलाईन लीक झाली, ज्यात प्रभास एक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून कथानकात बोल्ड दृश्ये असल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर वंगाची ती संतप्त पोस्ट आली.

deepika padukone बाहेर पडल्यावर, ‘animal’ फेम tripti dimri हिची ‘spirit’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर तिने स्वतः याबाबत पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला. वंगा यांनीही तिला स्वागत करत पोस्ट लिहिली, “The female lead for my film is now official :-)”

हे पण वाचा.. ट्रेंडमध्ये ‘fund kaveri engine’ का आहे? स्वदेशी तंत्रज्ञानासाठी जनतेचा सरकारला संदेश!

tripti dimri ला करिअरमधील सर्वात मोठी फी

tripti dimri हिला ‘spirit’साठी तब्बल 6 कोटी रुपये मानधन दिलं जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ही तिच्या करिअरमधील सर्वात मोठी कमाई मानली जात आहे. यापूर्वी ‘animal’मध्ये वंगासोबत काम केलेल्या tripti dimri साठी ही भूमिका मोठी संधी मानली जाते.

सुरू होतोय ‘फेमिनिझम’ वि. प्रोफेशनलिजमचा वाद

sandeep reddy vanga च्या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन भाग पडले आहेत. काही जण deepika padukone वर NDA तोडल्याचा आरोप करत आहेत, तर काहींनी तिच्या अटींना योग्य ठरवून निर्मात्यांवरच टीका केली आहे. अनेकांच्या मते, ती एक यशस्वी आणि नव्याने मातृत्व स्वीकारलेली अभिनेत्री म्हणून, तिचे अटी घालणं चुकीचं नव्हतं.

deepika padukone ने अद्याप ‘spirit’मधून बाहेर पडण्याविषयी अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. पण वंगा यांच्या अप्रत्यक्ष वक्तव्यांनी या प्रकरणाची तीव्रता निश्चित वाढवली आहे.

‘spirit’चा पुढचा प्रवास

सध्या ‘स्पिरीट’चं चित्रिकरण लवकरच सुरू होणार असून, प्रभास आणि तृप्ती डिमरी या नव्या जोडीच्या केमिस्ट्रीकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. deepika padukone चा चित्रपटातून बाहेर पडणं हा तिचा निर्णय होता की निर्मात्यांचा—यावर अद्याप मतभेद आहेत. पण इतकं निश्चित की या सगळ्या वादात ‘स्त्रीवाद‘, व्यावसायिक अटी आणि गोपनीयता या विषयांवर पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत खुली चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *