Sonali Patil Grandfather Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. Bigg Boss Marathi 3 फेम अभिनेत्री Sonali Patil हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या आजोबांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. या घटनेमुळे सोनालीसह संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं असून, अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
Sonali Patil हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आजोबांसोबतचे काही भावुक क्षण असलेला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत तिने लिहिलेली पोस्ट अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी आहे. आजोबांशी असलेलं तिचं जिव्हाळ्याचं नातं या शब्दांतून स्पष्टपणे जाणवतं. वाड्यातल्या आठवणी, त्यांच्या पैलवानकीच्या गोष्टी, शिक्षणाबाबतची त्यांची सकारात्मक भूमिका, मुलींनी सक्षम व्हावं यासाठी दिलेले संस्कार, घरगुती सवयी आणि लहानसहान गोष्टींच्या आठवणी सोनालीने अतिशय भावनिक पद्धतीने मांडल्या आहेत.
या पोस्टमध्ये Sonali Patil हिने आजोबांना ‘बापू’ म्हणत संबोधलं असून, “तुमच्याकडे येणारी आमची पावलं आता थांबलीत” हे वाक्य अनेकांच्या मनाला चटका लावणारं ठरलं आहे. आजोबा कुठेही असले तरी त्यांचं लक्ष कायम कुटुंबावरच राहील, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. पोस्टच्या शेवटी ‘ॐ शांती’ असे शब्द लिहून तिने त्यांना अखेरचा निरोप दिला आहे.
सोनालीची ही पोस्ट पाहून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी तिला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचं आणि आजोबांचं नातं फार खास होतं, हे याआधीही अनेकदा तिने मुलाखतींमधून सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनाचा धक्का तिला अधिकच भावनिकरीत्या बसला आहे.
कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर Sonali Patil हिने ‘वैजू नंबर वन’, ‘घाडगे अँड सून’ आणि ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलीकडेच ती कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. मात्र सध्या तिच्या आयुष्यातील हा वैयक्तिक दुःखाचा काळ असून चाहते आणि सहकारी तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
हे पण वाचा.. कमळी मालिकेतील कमळीचा फोटो व्हायरल, साधेपणातलं सौंदर्य ठरतंय खास
आजोबांच्या आठवणी, त्यांच्याकडून मिळालेले संस्कार आणि प्रेम हे कायम तिच्या सोबत राहतील, अशी भावना Sonali Patil हिच्या शब्दांतून प्रकर्षाने जाणवते.
हे पण वाचा.. तेजस्विनी लोणारे–समाधान सरवणकर यांच्या व्हाईट थीम घराची झलक; साधेपणातली एलिगन्स जिंकतेय मनं







