soham bandekar pooja birari wedding reception mumbai : आदेश बांदेकर यांच्या एकुलत्या मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाचा जल्लोष अजूनही रंगतच आहे. २ डिसेंबरला लोणावळ्यात थाटामाटात पार पडलेल्या लग्नानंतर आता मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनला राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. Soham Bandekar Pooja Birari या जोडीच्या रिसेप्शनने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला असून पाहुण्यांचे अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत.
रिसेप्शनला सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीने. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी येऊन सोहम-पूजाचे अभिनंदन केले. नवदाम्पत्याने रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचीही या समारंभात विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.
मनोरंजन क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही एव्हरग्रीन जोडी रिसेप्शनला आली होती. त्यांच्यासह रोहिणी हटंगडी, श्रेयस तळपदे, केदार शिंदे, नीना कुलकर्णी, क्रांती रेडकर-समीर वानखेडे, अजिंक्य देव, कविता मेढेकर, तुषार दळवी, सोनाली खरे, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव आणि अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी सोहम आणि पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
रिसेप्शनमध्ये सोहम बांदेकर पूजा बिरारी यांच्या लुकचीही खास चर्चा झाली. पूजा बिरारीने सोनेरी रंगाचा देखणा लेहेंगा परिधान केला होता, तर सोहम नेव्ही ब्लू सूटमध्ये अतिशय आकर्षक दिसत होता. त्यांच्या एंट्रीपासून ते फोटो सेशनपर्यंत सर्वत्र स्टार जोडीचा तोरा आणि ग्लॅमर स्पष्ट जाणवत होतं.
वर्कफ्रंटकडे पाहिल्यास सोहम बांदेकर सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकांचा निर्माता म्हणून कार्यरत आहे. तर पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून यापूर्वी ‘स्वाभिमान’ मालिकेद्वारे नाव कमावलं आहे.
हे पण वाचा.. “ही गोष्ट जमेल तेव्हाच आई होईन” – हृता दुर्गुळे ने सांगितला आईबद्दलचा खास किस्सा
सोहम बांदेकर पूजा बिरारी यांच्या रिसेप्शनचा हा दिमाखदार सोहळा अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीने उजळून निघाला असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चर्चा अजूनही जोरात सुरू आहे.
हे पण वाचा.. अभिनेता अमित रेखी ची नवी सुरुवात बहिणीसोबत सुरू केला व्यवसाय, साखरपुड्यानंतर मोठी घोषणा









