ADVERTISEMENT

आपल्या घरची मुलगी असती तर…’ स्मृती मानधनाचे लग्न प्रकरणावर सलील कुलकर्णींचा जोरदार सवाल!

smriti mandhana wedding controversy : स्मृती मानधनाच्या लग्ना संदर्भात सोशल मीडियावर वाढलेल्या चर्चांवर संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत स्मृती मानधनाच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे.
smriti mandhana wedding controversy

smriti mandhana wedding controversy : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच्या लग्नाविषयी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. स्मृती मानधनाचे लग्न २३ नोव्हेंबरला पार पडणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. मात्र स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची पुष्टी तिच्या मॅनेजरकडून देण्यात आली. यानंतर परिस्थिती शांत होण्याऐवजी उलट सोशल मीडियावर नवनव्या चर्चांना उधाण आलं.

स्मृतीने पलाशसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवरून हटवले, इतकंच नव्हे तर डी वाय पाटील स्टेडियममधील प्रपोजलचा व्हिडीओही डिलीट झाल्याने अनेकांनी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली. क्रिकेट मैत्रिणींना साखरपुड्याबद्दल सांगत असलेला तिचा व्हिडीओ हटवल्यानंतर नेटकऱ्यांच्या अंदाजांना आणखी वेग आला.

या वादळातच पलाश मुच्छलची बहीण पलकने दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं. आता या विषयावर गायक सलील कुलकर्णी यांनीही स्पष्ट प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पसरत असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे.

सलील कुलकर्णी म्हणाले, “आपण नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची घाई का करतो? स्मृती मानधनाचे लग्न संदर्भात जे काही घडत असेल, ते तिचं कुटुंब आणि ती स्वतः योग्य प्रकारे सांभाळेल. आपल्या घरची मुलगी असती तर आपण असेच बोललो असतो का?” त्यांनी सातत्याने पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर टीका करत समंजसपणे वागण्याचा सल्ला नेटकऱ्यांना दिला.

ते पुढे म्हणाले, “एखादी गोष्ट आधी कळली तर त्यातून काय साध्य होणार? लोकांनी थोडा संयम ठेवून तिच्या खासगी आयुष्याचा आदर करावा. ती देशासाठी खेळते, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनावश्यक चर्चा करणं योग्य नाही.”

हे पण वाचा.. घुसमट होते… राजकारणातील काही जण फूट पाडतात, नाना पाटेकर यांची तरुणांना स्पष्ट आठवणhttp://घुसमट होते… राजकारणातील काही जण फूट पाडतात, नाना पाटेकर यांची तरुणांना स्पष्ट आठवण

या व्हिडीओवर अनेकांनी सहमती दर्शवली असून, “योग्य बोललात सर”, “तिच्या आयुष्याचा निर्णय तिने घ्यायचा” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.

स्मृती मानधनाचे लग्न संदर्भात निर्माण झालेलं वातावरण शांत व्हावं आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक ती गोपनीयता मिळावी, अशी अपेक्षा आता अनेकजण व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा.. Girija Oak रातोरात चर्चेत; चाहत्याचा मजेशीर मेसेज वाचून अभिनेत्रीही थक्क!

smriti mandhana wedding controversy