नेहमी आपल्या फलंदाजीने विरोधकांना क्लीन बोल्ड करणारी smriti mandhana तिच्या स्टायलिश अंदाजानेही चाहत्यांचे हृदय जिंकते. मैदानात आणि मैदानाबाहेरही तिने स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. जाणून घ्या, देशाच्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरची कहाणी.
Table of Contents
भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार फलंदाज स्मृती मंधाना (smriti mandhana) केवळ तिच्या अप्रतिम खेळासाठीच नव्हे तर तिच्या अफलातून फॅशन सेन्स आणि जीवनशैलीसाठीही चर्चेत असते. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारी स्मृती मैदानाबाहेरही तिच्या स्टायलिश लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते.
2024 मध्ये तिची एकूण संपत्ती सुमारे 33 कोटी रुपयांवर पोहोचली असून, ती देशातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर ठरली आहे. हरमनप्रीत कौरनंतर सर्वाधिक संपत्ती असलेल्या या क्रिकेटरने केवळ मैदानावरच नव्हे तर स्टाईलच्या दुनियेतही आपली छाप पाडली आहे.
फॅशन आणि लाइफस्टाईलमध्येही सुपरस्टार
smriti mandhana नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर नवीन पोस्ट शेअर करत असते त्यातून तिच्या फॅशन सेन्स नेहमीच प्रभावी करतो. वेस्टर्न गाऊन्सपासून पारंपरिक लहंग्यापर्यंत प्रत्येक लूकमध्ये ती अफलातून दिसते. एअरपोर्ट लुक, फेस्टिव्हल वियर, कॅज्युअल आउटफिट्स किंवा एथलीझर, प्रत्येक स्टाईलमध्ये तिचा आत्मविश्वास झळकतो.
ती केवळ क्रिकेटच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर नवीन पिढीसाठीही एक फॅशन आयकॉन बनली आहे.
हे पण वाचा.. Zapuk Zupuk’ review: सूरज चव्हाणच्या हटके अदा पण कथा दिशा भरकटली!
स्टायलिश लुक्सची चर्चा
एका कार्यक्रमात ती काळ्या फुल स्लीव्ह्ज गाऊनमध्ये दिसली होती, ज्याच्या हाय नेक डिझाईनला सोन्याच्या धाग्यांनी सजवले होते. समोर नॉट स्टाईल डिझाईन आणि लहान फोल्ड्सने हा लूक आणखीनच आकर्षक झाला होता.
दुसऱ्या एका लूकमध्ये तिने शिमरी ग्रीन सिक्विन गाऊन परिधान केला होता, ज्याला डीप व्ही नेकलाइन आणि बॉडी फिटेड डिझाइन दिले गेले होते. खाली नेट डिटेलिंगमुळे हा लूक अधिक ग्लॅमरस वाटला.
एका पार्टीत ती काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमध्ये दिसली, ज्यात बॅलून स्लीव्ह्ज टॉप आणि क्लासी स्कर्टचा सुंदर कॉम्बिनेशन दिसून आला.
पारंपरिक वेशभूषेतही स्मृतीची जादू काही कमी नाही. ब्राउनिश मेहरून रंगाच्या कुर्त्यासोबत तिने मॅचिंग दुपट्टा स्टाईल केला होता, ज्यावर शेल्ससह सुंदर लेस लावली होती.
यलो सिल्कच्या लहंग्यातील तिचा लूक तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. फुल स्लीव्ह्ज चोळी आणि मोकळा दुपट्टा याने तिचा लूक आणखी खुलवला.
कॅज्युअल लूकमध्येही स्मृतीने आपली वेगळी छाप सोडली आहे. क्रॉप टॉप, फ्लेयर पॅन्ट्स आणि प्रिंटेड लॉन्ग श्रग स्टाईल जॅकेटमध्ये ती अगदी हटके दिसली होती.

संपत्ती कशी वाढली?
smriti mandhana ची संपत्ती वाढवण्यात तिच्या BCCI करार, Women’s Premier League (WPL) मध्ये मिळालेले भरघोस मानधन आणि ब्रँड एंडोर्समेंटचा मोठा वाटा आहे.
तिला WPL मध्ये तब्बल 3.4 कोटी रुपये मिळाले होते, ती या लीगमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली.
ती Nike India, Hyundai, आणि इतर ब्रँड्सची ब्रँड अँबेसडर आहे.
Instagram वर तिचे 8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे ब्रँड्सना मोठी प्रसिद्धी मिळवून देतात.
मैदानावरील विक्रम
क्रिकेटच्या मैदानावरही smriti mandhana ने आपला ठसा उमठवला आहे:
97 वनडे, 148 टी20 आणि 7 टेस्ट सामने खेळले.
वनडेमध्ये 4209 धावा, टी20 मध्ये 3761 धावा, तर टेस्टमध्ये 629 धावा केल्या आहेत.
तिच्या नावावर 10 वनडे शतकं आणि 2 टेस्ट शतकं आहेत.
2024 मध्ये तिने 1659 आंतरराष्ट्रीय धावा करत एका वर्षात सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटर बनण्याचा विक्रम केला.
WPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला विजेते बनवण्यात मोठी भूमिका बजावली.
smriti mandhana चा प्रेरणादायी प्रवास
मुंबईत जन्मलेली आणि सांगलीत वाढलेली स्मृती वयाच्या चारव्या वर्षीपासून क्रिकेट खेळतेय. वडील श्रीनिवास आणि भाऊ श्रवण यांच्या प्रेरणेतून तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या नऊव्या वर्षी तिला महाराष्ट्र अंडर-15 संघात स्थान मिळाले.
शालेय जीवनातही तिने अभ्यास आणि क्रिकेट यांचा समतोल राखला. 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे डेब्यू केल्यानंतर तिच्या करियरला वेग आला आणि ती आजच्या घडीला भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार बनली आहे.