siddharth khirid marriage announcement : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाच्या बातम्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेक लोकप्रिय कलाकार एकामागोमाग एक लग्नबंधनात अडकत असताना आता या यादीत अभिनेता Siddhart Khirid याचं नावही समाविष्ट झालं आहे. सोशल मीडियावर काही खास आणि हटके फोटो शेअर करत सिद्धार्थने केवळ प्रेमाची कबुलीच दिली नाही, तर अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्याची वेडिंग डेटदेखील सर्वांसमोर आणली आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ आणि ‘मुरांबा’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून Siddharth Khirid घराघरांत पोहोचला. त्याच्या सहज अभिनयशैलीमुळे आणि पडद्यावरील साधेपणामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग तयार झाला. साधारण वर्षभरापूर्वी ‘Single अध्याय संपला’ असं म्हणत त्याने आपल्या आयुष्यातील प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केल्याची झलकही चाहत्यांनी पाहिली होती.
Siddharth Khirid ज्यांच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे, त्या डॉ. मैथिली भोसेकर केवळ सौंदर्यवतीच नाहीत, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वतःचं नाव कमावलं आहे. मैथिलीने ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा किताब जिंकत भारताचा गौरव केला होता. इतकंच नाही, तर पॅरिस फॅशन वीकमध्ये सिग्नेचर मॉडेल म्हणूनही ती झळकली होती, ज्यामुळे तिची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली.
अलीकडेच Siddharth Khirid ने सोशल मीडियावर “Launching Soon” असा कॅप्शन देत काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये लग्नाची तारीख अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने लपवण्यात आली होती. एका फोटोमध्ये मैथिली वृत्तपत्र वाचताना दिसते आणि त्यात २३ जानेवारी २०२६ ही तारीख ठळकपणे नमूद केलेली आहे. या अनोख्या कल्पनेमुळे चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
लग्नाची बातमी समोर येताच मराठी कलाकार, मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून Siddharth Khirid आणि मैथिलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्री-वेडिंग शूटसाठी या दोघांनी वेस्टर्न लूक निवडला असून त्यांची केमिस्ट्री फोटोमधूनही स्पष्टपणे जाणवते.
हे पण वाचा.. अभिनेत्री रसिका वाखारकर अडकली विवाहबंधनात, शुभांकर उंब्राणीसोबत थाटात पार पडला लग्नसोहळा
दरम्यान, गेल्या वर्षी गोव्यात Siddharth Khirid ने मैथिलीला लग्नाची मागणी घातली होती. त्यासाठी त्याने खास प्लॅनिंग करत बॉलीवूड गाण्यांवर डान्ससह तिला सरप्राइज दिलं होतं. त्या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता या रोमँटिक प्रवासाचा शेवट विवाहात होत असल्याने चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच खास ठरत आहे.
हे पण वाचा.. प्राप्ती रेडकर–शरयू सोनावणे यांचं खास बॉण्डिंग, मुलाखतीत उलगडलं मैत्रीचं नातं







