गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण. बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात सजावट केली जाते. काहीजण फुलांनी सजवतात, काही इको-फ्रेंडली थीम निवडतात, तर काही वेगळेपणासाठी स्वतःच नवीन संकल्पना राबवतात. यंदा लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्वेता महाडिक (Shweta Mahadik) हिने बाप्पासाठी केलेली सजावट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Shweta Mahadik ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘Marine Theme’ ही खास संकल्पना निवडली. तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ म्हणजेच ६० दिवस तिने या भव्य देखाव्याच्या तयारीसाठी मेहनत घेतली. समुद्राच्या जगाशी संबंधित प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, कासव, ऑक्टोपस, डॉल्फिन अशी अनेक समुद्री जीवसृष्टी तिने घरच्या घरी बनवली. इतकंच नव्हे, तर गणरायाचा मुकूटही या थीमला साजेसा खास डिझाइन केला. त्यामुळे संपूर्ण सजावट पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष समुद्राखालचं दृश्य अनुभवता आलं.
विशेष म्हणजे, या अभिनेत्री Shweta Mahadik ने फक्त देखावा नव्हे तर बाप्पाची मूर्ती देखील स्वतःच घडवली आहे. मूर्तीवरील हार-गिरवाणीपासून मुकुटापर्यंत प्रत्येक गोष्ट तिने स्वतः बनवल्याने तिच्या मेहनतीचं आणखी कौतुक होत आहे.
Shweta Mahadik फक्त अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियावर एक क्रिएटिव्ह इन्फ्लुएन्सर म्हणूनही लोकप्रिय आहे. ती नेहमी घरच्या घरी कमी खर्चात डिझायनर कपडे, पर्स, दागिने कसे तयार करायचे, याबाबत चाहत्यांना टिप्स देते. तिच्या भन्नाट कल्पनाशक्तीला आधीच मोठी दाद मिळत असते. पण यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेला हा भव्य मरीन थीम देखावा तिच्या चाहत्यांच्या मनाला आणखी जवळ घेऊन गेला आहे.
हे पण वाचा.. Rinku Rajguru च्या घरी बाप्पाचे आगमन; अभिनेत्रीचा साडीतील लूक झाला चर्चेचा विषय
अभिनेत्री Shweta Mahadik च्या या अनोख्या उपक्रमाला सेलिब्रिटींकडूनही भरभरून दाद मिळत आहे. किशोरी अंबिये, ऋतुजा बागवे, जुई गडकरी, प्रियांका तेंडोलकर, सुकन्या मोने यांसारख्या अनेक कलाकारांनी श्वेताच्या मेहनतीवर आणि कलागुणांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरचे चाहते तर तिच्या या कल्पकतेवर अक्षरशः थक्क झाले आहेत.
एकंदर, Shweta Mahadik हिने साकारलेला समुद्री देखावा हा फक्त सजावटीचा भाग नाही, तर तिच्या कलात्मकतेचं आणि चिकाटीचं प्रतीक ठरला आहे. गणरायाच्या आगमनाचा आनंद अधिकच खुलवणारा हा उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवातील एक विशेष आकर्षण ठरत आहे.
हे पण वाचा.. Vivek Sangle चा संकल्प : शाडूच्या मूर्तीनेच बाप्पाचं स्वागत, गणेशोत्सवात पर्यावरणपूरक संदेश”









