shubhangi sadavarte second marriage kelvan video : अभिनेत्री शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) पुन्हा एकदा आयुष्यातील नव्या प्रवासाकडे वाटचाल करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने घटस्फोटाची घोषणा केली होती, मात्र आता ती दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. शुभांगीने तिच्या होणाऱ्या पती सुमित म्हशेळकरसोबतचा केळवणाचा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसमोर आणली. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शुभांगीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
केळवणाचा खास समारंभ शुभांगी आणि सुमितच्या मित्र-मैत्रिणींनी आयोजित केला होता. सजावट, वातावरण आणि दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान—सगळंच या व्हिडीओतून जाणवत होतं. ‘जुळली गाठ गं’ अशा कॅप्शनसह पोस्ट केलेल्या या व्हिडीओत शुभांगीची खिलखिलती मुद्रा अनेकांना भावली. दुसरीकडे सुमितनेही ‘नवराई माझी नवसाची’ असं लिहीत केळवणाच्या सरप्राइजसाठी मित्रांचे आभार मानले. दोघांचेही हे व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाले.
शुभांगी सदावर्ते हिच्या वैयक्तिक आयुष्यातील हा बदल विशेष ठरतो कारण तिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. २०२० मध्ये करोना काळात अगदी साधेपणाने झालेलं हे लग्न पाच वर्षांच्या संसारानंतर संपुष्टात आलं. सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा त्यांनी शुभांगीच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर शुभांगीचा केळवणाचा व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी तिच्या नव्या सुरुवातीला मनापासून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या आनंदी आयुष्याची कामना व्यक्त केली. मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी शुभांगी सदावर्ते आता पुन्हा एकदा नव्या नात्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तिचे चाहतेही या बदलाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्मीच्या पावलानी’ मालिकेत मोठा धक्का; मुख्य नायिकेचा एक्झिट आणि शोमध्ये नवा अध्याय सुरू
आवलीची दमदार भूमिका असलेलं ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक, ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनय आणि ‘महाराष्ट्र शाहीर’मधील झळक—या सर्वांमुळे शुभांगीने आपल्या करिअरमध्ये भक्कम ओळख निर्माण केली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याचा हा नवा अध्याय तितकाच खास ठरणार यात शंका नाही.
हे पण वाचा.. जुई गडकरी चा थरकाप उडवणारा अनुभव; ऑडिशनच्या बहाण्याने झाला फ्रॉड कॉल, जीव वाचवत बाहेर पडली अभिनेत्री









