Shruti Marathe gloves video new fun : अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) आणि अभिनेता गौरव घाटणेकर हे मराठी मनोरंजनविश्वातील चर्चेत असलेले जोडीदार. त्यांच्या नात्यातील मजेशीर क्षण ते सोशल मीडियावर शेअर करत राहतात. त्यातीलच एक नवीन व्हिडीओ सध्या भरपूर व्हायरल होत आहे. गौरवने आपल्या इन्स्टाग्रामवर टाकलेल्या या व्हिडीओमध्ये श्रुती मराठे ग्लोव्ह्ज घालून जेवण करताना दिसते, आणि यावर गौरवची मजेशीर कमेंट चाहत्यांचे लक्ष वेधते.
व्हिडीओमध्ये गौरव सांगतो की, श्रुती नुकतीच नेल ट्रीटमेंट करून आली आहे. घरी आल्यावर तिच्यासमोर भेंडीची भाजी आणि भाकरी होती. मात्र मॅनिक्युअर खराब होऊ नये म्हणून श्रुती मराठे थेट ग्लोव्ह्ज घालूनच जेवायला बसली. हळदीचा रंग लागला तर नेल जॉब खराब होईल, म्हणून तिने हा पर्याय निवडला, असे गौरव हसत सांगताना दिसतो. या संपूर्ण प्रसंगावर त्याची खोडकर टिप्पणी व्हिडीओला अधिक रंगत आणते.
या व्हिडीओखाली श्रुती मराठे हिनेही मजेशीर शैलीत प्रतिक्रिया देत लक्ष वेधले. “मला दोन प्रश्न आहेत – एक, श्रुतीताई म्हणजे कोण? आणि दुसरा, नेल जॉब म्हणजे काय?” असे लिहित तिने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या. तिच्या या कमेंटला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
फक्त श्रुतीच नव्हे, तर मराठी अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे आणि हेमांगी कवी यांनीही या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करत धमाल वाढवली. शर्मिलाने “रबरी भेंडी, जबरी भेंडी” अशी खुमासदार प्रतिक्रिया दिली, तर हेमांगीने “ताईंचा नाद करायचा नाय, गौरव! असे अजून व्हिडीओ पाहूया आम्हाला,” असे लिहिले.
हे पण वाचा.. मुक्ता बर्वे पुन्हा करणार धमाल; ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर अर्जुन–सायलीसोबत रंगणार भन्नाट भाईगिरी
सोशल मीडियाच्या युगात कलाकारांच्या खासगी आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचतात. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांची ही जोडीही नेहमीच चाहत्यांना अशा हलक्या-फुलक्या क्षणांमधून जोडून ठेवते. अभिनयाबरोबरच निर्मितीच्या क्षेत्रातही ते सक्रीय आहेत आणि सोशल मीडियावरही तितकेच लोकप्रिय आहेत. हा ताज्या व्हिडीओने पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री चाहत्यांसमोर आणली आहे.
हे पण वाचा.. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा बदल? ईशा केसकर मालिका सोडणार नव्या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चर्चा









