ADVERTISEMENT

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकत्र? सोशल मीडियावर चर्चांना उधाण नवीन प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार का?

shreyas talpade prarthana behere upcoming collab : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, असा प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ'नंतर हे दोघे अजय मयेकरसोबत स्पॉट झाल्याने नवीन कलाकृतीची चर्चा रंगली आहे.
shreyas talpade prarthana behere upcoming collab

shreyas talpade prarthana behere upcoming collab : मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली जोडी म्हणजे श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून पहिल्यांदाच या दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘नेहा’ आणि ‘यश’ ही पात्रं प्रेक्षकांच्या मनावर इतकी गाजली की मालिकेच्या शेवटानंतरही चाहत्यांनी त्यांना एकत्र पाहण्याची मागणी वारंवार केली.

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. राजश्री मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र दिसले. ते श्री स्वामी समर्थांच्या मंदिरातून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे, श्रेयसच्या हातात एक फाइलही होती आणि चाहत्यांनी ती कदाचित नवीन प्रोजेक्टची स्क्रिप्ट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

यामुळे आता चर्चा रंगली आहे की, ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार का? आणि जर दिसली, तर ती चित्रपट असणार की नवीन मालिका? याचं उत्तर येणारा काळच देईल, पण या भेटीनं चाहत्यांच्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवलं आहे.

प्रार्थना बेहेरे नुकतीच ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर श्रेयस तळपदे सतत वेगवेगळ्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असतो. या दोघांनी केलेल्या भूमिकांना कायमच प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जर हे कलाकार पुन्हा एकत्र एखाद्या प्रोजेक्टमध्ये झळकले, तर ते प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरणार आहे.

हे पण वाचा.. अभिनेत्री रसिका वखारकर चा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याचं नाव आलं समोर

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका 2021 मध्ये सुरू झाली होती आणि 2023 मध्ये संपली. या प्रवासात मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. अजय मयेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या मालिकेतून Shreyas Talpade & Prarthana Behere यांची जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती.

आता मात्र या तिघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. खरोखरच प्रार्थना आणि श्रेयस नव्या कलाकृतीतून एकत्र झळकले, तर ते मराठी मनोरंजन विश्वातील मोठं आकर्षण ठरेल यात शंका नाही.

हे पण वाचा.. अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

shreyas talpade prarthana behere upcoming collab