shivani sonar tarini serial new year resolution : लोकप्रिय अभिनेत्री Shivani Sonar सध्या ‘तारिणी’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. झी मराठीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सध्या कथानकात सुरू असलेलं ‘मिशन गृहप्रवेश’ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. केदारशी विवाह करून तारिणीचा खांडेकर कुटुंबात होणारा प्रवेश आणि त्यानंतर तिचा पुढील प्रवास कसा असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना Shivani Sonar हिने २०२५ हे वर्ष स्वतःसाठी अत्यंत खास असल्याचं सांगितलं. याच वर्षाच्या सुरुवातीला तिचं लग्न झालं आणि आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात, मात्र तिच्यासाठी हे बदल सकारात्मक ठरल्याचं ती सांगते. कुटुंबापासून दूर राहण्याची सवय नसताना नव्या आयुष्याशी जुळवून घेणं सुरुवातीला अवघड वाटलं, असंही तिने प्रांजळपणे मान्य केलं. आजही ती आपल्या कुटुंबाला मिस करते, विशेषतः यावर्षी कामानिमित्त बंगळुरूला गेलेल्या धाकट्या भावाची आठवण तिला सतत येते. मात्र तो आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचं पाहून तिला समाधान वाटत असल्याचं Shivani Sonar म्हणते.
व्यावसायिक पातळीवर पाहिलं तर २०२५ हे वर्ष तिच्यासाठी आणखी खास ठरलं आहे. ‘तारिणी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे तिच्यासाठी मोठं यश असल्याचं ती सांगते. झी मराठीसोबतचा हा तिचा पहिलाच अनुभव असून, सेटवरचं वातावरण आणि कामाची पद्धत तिला खूप आवडल्याचंही तिने नमूद केलं. संपूर्ण महाराष्ट्रात मालिकेचे भव्य होर्डिंग्ज लागलेले पाहून आणि त्यावर स्वतःचा फोटो झळकताना पाहून मनापासून आनंद झाल्याचं Shivani Sonar ने सांगितलं.
मात्र या सगळ्या गडबडीत आरोग्याकडे पुरेसं लक्ष देता न आल्याची खंत तिला आहे. त्यामुळे आगामी वर्षात व्यायाम, झोप आणि दैनंदिन जीवनशैली सुधारण्याचा ठाम निर्णय तिने घेतला आहे. हा बदल हळूहळू अमलात आणत असल्याचं ती सांगते. नवीन वर्षाचं स्वागत सहसा कुटुंब आणि मित्रांसोबत करण्याची तिची सवय असली, तरी यंदा शूटिंगमुळे ती सेटवर असण्याची शक्यता आहे. तरीही काम सांभाळून आपल्या माणसांसोबत नववर्ष साजरं करण्याचा तिचा प्रयत्न असेल, असं Shivani Sonar हिने स्पष्ट केलं.
हे पण वाचा.. हातावर मेहेंदी, हिरवा चुडा आणि मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकर च्या व्हायरल फोटोमुळे लग्नाच्या चर्चा रंगात
दरम्यान, ‘तारिणी’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होते. या मालिकेत Shivani Sonar सोबतच अभिज्ञा भावे, स्वराज नागरगोजे, रागिणी सामंत आणि अविनाश नारकर यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून, त्यामुळे मालिकेची रंगत आणखी वाढली आहे.
हे पण वाचा.. मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरचं साऊथ इंडियन थीममधील प्री-वेडिंग फोटोशूट व्हायरल









