shivani sonar sasubai god padarath : मराठी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी Shivani Sonar सध्या लोकप्रिय मालिकांमधील एक चेहरा बनली आहे. ‘झी मराठी’वरील ‘तारिणी’ या मालिकेतील तिच्या सशक्त अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ हा भव्य सोहळा रंगला आणि या कार्यक्रमादरम्यान शिवानीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोड किस्सा सर्वांसमोर शेअर केला.
कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपल्या आठवणींमधील खास गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्यातच शिवानीला लहानपणी कोणत्या पदार्थाची सर्वाधिक आवड होती, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर ती हसतच म्हणाली, “मला माझ्या आत्याच्या हातची पुरणपोळी खूप आवडते. पुरणपोळी आणि तूप हे माझं आवडतं समीकरण आहे.” प्रेक्षकांनीही तिच्या या candid उत्तरावर टाळ्या वाजवत कौतुक केलं.
पण यानंतर शिवानीने लग्नानंतरचा एक गोड अनुभव सांगितला आणि सर्वांचंच लक्ष तिच्याकडे खिळलं. “आता माझं लग्न झालं आहे आणि माझ्या सासुबाईंच्या हातचा स्टॉबेरीखंड मला खूप आवडतो. त्या इतक्या अप्रतिम प्रकारे तो बनवतात की प्रत्येक वेळेस मी तो आवडीने खाते,” असं ती म्हणाली. या गोड आठवणीतून तिच्या आणि सासूबाईंच्या नात्यातील जवळीकही स्पष्टपणे जाणवत होती.
शिवानी सोनारने जानेवारी २०२५ मध्ये अंबर गणपुळे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न सोहळ्याला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नाआधीच दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं होतं.
अभिनयात व्यस्त असूनही शिवानी कुटुंबातील नातेसंबंधांना तितकंच महत्त्व देते, हे तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतं. आपल्या सासुबाईंच्या हातच्या गोड पदार्थाचं असं कौतुक करून तिने फक्त त्यांच्या प्रेमाचीच नाही तर एक सुंदर कौटुंबिक बंधही अधोरेखित केला आहे.
हे पण वाचा.. ९ वर्षांनी प्रेमात पडला ‘उतरन’ फेम नंदिश संधू; अभिनेत्री कविता बॅनर्जीशी गुपचूप साखरपुडा, अमृता खानविलकरची खास कमेंट!
मनोरंजन क्षेत्रात चमकदार कारकीर्द घडवतानाच वैयक्तिक आयुष्यही तेवढ्याच प्रेमाने जगणारी ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात आपली जागा अधिकच घट्ट करत आहे. त्यामुळेच ‘तारिणी’ मालिकेप्रमाणेच तिच्या आयुष्यातील हे गोड क्षणही चाहत्यांसाठी विशेष ठरत आहेत.
हे पण वाचा.. Bigg Boss 19 मालती चहर आणि मृदुल तिवारी मध्ये वाद पेटला दोघांमध्ये तुफान शाब्दिक झटापट! प्रोमो पहिलात का?







