shivani rangole virajas kulkarni cruise love story : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री Shivani Rangole आणि अभिनेता Virajas Kulkarni. ऑन-स्क्रीन भूमिकांमुळे दोघांना मोठी लोकप्रियता लाभलीच, पण त्यांच्या ऑफ-स्क्रीन प्रेमकहाणीमुळेही ते नेहमीच चर्चेत राहतात. नुकतीच दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी लग्नाआधीचा एक खास आणि मजेदार किस्सा शेअर केला आहे — जो ऐकून चाहत्यांनाही हसू आवरलं नाही.
शिवानीला नेहमीच प्रपोजलचा क्षण थोडा हटके हवा होता. त्यामुळे लग्नाची तारीख ठरल्यावर विराजसने तिला एका खास पद्धतीने प्रपोज करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने गोव्याच्या सुंदर किनाऱ्यावर क्रूजवर सरप्राईज प्रपोजल प्लॅन केलं. १४ फेब्रुवारी सांगून प्रत्यक्षात २ जानेवारीला तिला सरप्राईज देण्याचं त्याचं ठरलं होतं. सूर्यास्ताच्या क्षणी अंगठी देण्याचा त्याचा प्लॅन होता.
मात्र नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. गोव्यात पोहोचल्यावर क्रूजच्या चार डेकखाली कोविडची एक संशयित केस आढळली. त्यामुळे संपूर्ण क्रूजला थांबवण्यात आलं आणि प्रवाशांची तपासणी सुरू झाली. अंगठी खिशातच राहिली आणि रोमँटिक प्रपोजलचा प्लॅन थांबवावा लागला. तपासणीत कोणालाच संसर्ग नसल्याचं समजल्यावरही अधिकाऱ्यांनी जहाज परत मुंबईला पाठवलं.
या सगळ्या गोंधळात शेवटी विराजसने निर्णय घेतला की प्रपोजल याच क्रूजवरच करायचं. त्याने शिवानीसमोर मनातील प्रेम व्यक्त केलं आणि हा क्षण दोघांसाठी अविस्मरणीय ठरला. परतल्यावर मुंबईत सेलिब्रेशन करण्याचंही ठरलं.
हे पण वाचा.. गोव्याच्या किनारी भावना-सिद्धूच्या प्रेमाचा ‘तो क्षण’; लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी
मात्र, मुंबईत आल्यानंतर गोव्यातील टेस्ट मान्य न केल्याने दोघांना पुन्हा टेस्ट करावी लागली आणि त्यांचा क्रूजवरील मुक्काम वाढत गेला. नियोजन दोन दिवसांचं असतानाच शेवटी ते तब्बल पाच दिवस क्रूजवर अडकले. पण हा काळ त्यांच्या दोघांसाठी आनंदाचा ठरला. स्टाफही मराठी असल्याने त्या काळात दोघांनी छान वेळ घालवला. त्याच काळात काढलेला त्यांचा फोटो आजही त्यांच्या आठवणीत कायम आहे.
हा गमतीशीर किस्सा सांगताना विराजस आणि शिवानी दोघेही हसले. चाहत्यांनीही त्यांच्या या प्रेमकहाणीवर कौतुकाचा वर्षाव केला.
हे पण वाचा.. ‘बाईपण जिंदाबाद’ मालिकेतून स्त्रीशक्तीला सलाम; आठ लोकप्रिय अभिनेत्री एकत्र येणार छोट्या पडद्यावर









