ADVERTISEMENT

शिव ठाकरे च्या मुंबईतील घराला अचानक आग; व्हिडिओ समोर येताच चाहत्यांची चिंता वाढली

shiv thakare house fire incident mumbai : शिव ठाकरे च्या मुंबईतल्या राहत्या घराला अचानक आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या आगीत मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. सुदैवाने कुणालाही इजा न झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर आलं आहे.
shiv thakare house fire incident mumbai

shiv thakare house fire incident mumbai : ‘बिग बॉस मराठी’ आणि हिंदी ‘बिग बॉस १६’ मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कलाकार शिव ठाकरे (Shiv Thakare) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण अत्यंत चिंताजनक आहे. मुंबईतील कोल्टे पाटील वर्व्ह या इमारतीत असलेल्या त्याच्या राहत्या घराला आज सकाळी अचानक आग लागली. काही क्षणांतच धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याने रहिवाशांमध्येही एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या आगीचं भीषण रूप स्पष्टपणे दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्या. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने Shiv Thakare किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांना काहीही दुखापत झालेली नाही. मात्र आगीमुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाजातून समोर आलं आहे.

या प्रसंगाचे काही व्हिडिओ विरल भयानी आणि टेली मसाला या पेजेसवरून शेअर होताच ते काही क्षणातच व्हायरल झाले. चाहत्यांनी या व्हिडिओंवर दुःख आणि चिंता व्यक्त करत शिव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षिततेच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. अनेकांनी “देवा रक्षा कर” अशी प्रतिक्रिया देत त्याला मानसिक धैर्य देण्याचा प्रयत्न केला.

शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या दैनंदिन आयुष्याची झलक पाहायला मिळते. विशेषत: त्याच्या आजी आणि कुटुंबासोबतचे Moments तो सातत्याने शेअर करत असतो. त्यामुळे घराला आग लागल्याची माहिती समोर येताच चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण होणं स्वाभाविक होतं.

शिव ठाकरे ने या आगीबाबत अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. या घटनेनंतर त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट ला स्टोरी मधे लिहिल, “शॉर्टसर्किटमुळे माझ्या हॉलला आग लागली होती,
पण आता सर्व काही नियंत्रणात आहे
तुमच्या काळजी आणि विचारपूस करण्यासाठी मनापासून धन्यवाद.
बाप्पाच्या कृपेने मी सुरक्षित आहे आणि पूर्णपणे ठीक आहे.
माझं काहीही नुकसान झालेलं नाही.
गणपती बाप्पा मोरया” 

रिअॅलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हा कलाकार ‘रोडीज’ पासून ‘बिग बॉस’पर्यंतच्या प्रवासात प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान बनवू शकला. म्हणूनच ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांची काळजी वाढलेली दिसते.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 घरात गौरव खन्नाच्या पत्नीची सरप्राईज एन्ट्री; भावना, सल्ले आणि टास्कमुळे रंगला ‘फॅमिली वीक’

ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराचं मोठं नुकसान झाल्याने ही घटना शिव ठाकरे साठी निश्चितच धक्कादायक ठरली आहे.

हे पण वाचा.. सुरज चव्हाणला मिळालं स्वप्नवत घर; गृहप्रवेशानंतर अजित पवारांचे मानले विशेष आभार

shiv thakare house fire incident mumbai

शिव ठाकरे यांची इन्स्टाग्राम पोस्ट

shiv thakare house fire incident mumbai
शिव ठाकरे यांची इन्स्टाग्राम पोस्ट