shashank ketkar voting center outside garbage video : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली प्रचाराची धावपळ, सभा, रॅली यांना आज पूर्णविराम मिळाला असून मतदार आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकारांनीही लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेत मतदान केलं. मात्र याच मतदानादिवशी मराठी अभिनेता Shashank Ketkar याने एका वेगळ्याच मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Shashank Ketkar ने मतदान करून बाहेर पडताच मतदान केंद्र असलेल्या शाळेबाहेर साचलेल्या कचऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मतदानासारख्या महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी असलेली ही अस्वच्छता पाहून त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारा Shashank Ketkar याआधीही वाहतूक कोंडी, ट्रॅफिक, नागरी समस्या आणि सामाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडताना दिसला आहे. यावेळीही त्याने कोणतीही भीड न बाळगता वास्तव समोर ठेवलं आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओसोबत Shashank Ketkar ने एक खोचक पण विचार करायला लावणारी पोस्टही लिहिली आहे. ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचं साम्राज्य असल्याचं त्याने दाखवलं. पुढे तो म्हणतो की, उद्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहील, याची खात्री वाटत नाही. फक्त प्रशासनच नाही, तर नागरिकही अशा बाबतीत उदासीन असतात, अशी खंत त्याने व्यक्त केली.
ही भावना केवळ निराशेतून आलेली नाही, तर ही वस्तुस्थिती असल्याचं Shashank Ketkar ने स्पष्ट केलं आहे. ठाण्यातील एका नामांकित इंटरनॅशनल शाळेच्या दारातच अशी अवस्था असल्याचं त्याने अधोरेखित केलं. सार्वजनिक जागांची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न पुन्हा एकदा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
हे पण वाचा..Bigg Boss Marathi 6 : ‘मुलीच सीझन गाजवणार’, उत्कर्ष शिंदेंची पुरुष स्पर्धकांवर जोरदार टीका
दरम्यान, Shashank Ketkar च्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या या धाडसी भूमिकेचं कौतुक केलं असून, कलाकारांनी अशा मुद्द्यांवर आवाज उठवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मतदानाचा हक्क बजावताना स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव Shashank Ketkar च्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान गोंधळ, विशाल-ओमकारमध्ये जोरदार भिडंत







