‘Shashank Ketkar’ ने मुरांबा मालिकेतील बदलांवर प्रेक्षकांच्या नाराजीवर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही कलाकार हा केवळ छोटा भाग असून निर्णय मोठ्या टीमचा असतो.
शशांक केतकरची स्पष्ट भूमिका: मुरांबा मालिकेतील बदलांवर प्रेक्षकांच्या नाराजीला दिलं सडेतोड उत्तर
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता Shashank Ketkar सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत ‘अक्षय’च्या भूमिकेत झळकत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या सात वर्षांच्या लीपनंतर बऱ्याच बदलांनी मालिकेची दिशा थोडी बदलली आहे, आणि त्यामुळे काही प्रेक्षकांच्या नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.
या पार्श्वभूमीवर, स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये Shashank Ketkar प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर मनमोकळं बोलताना दिसतो. “मुरांबा”ने ११०० भागांचा टप्पा पार केला असून, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे हा प्रवास आनंददायी ठरल्याचं तो म्हणाला.
शशांक म्हणतो, “प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. मुरांबा ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात जास्त भागांची मालिका आहे.” मालिकेतील कथानक बदलल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर भाष्य करताना शशांकने स्पष्टपणे सांगितलं की, “अरे अजून किती पाणी घालणार?, किती वाढवणार?”, अशा कमेंट्स आमच्यापर्यंत येतात, पण त्यांचा हेतू समजून घेणं गरजेचं आहे.
हे पण वाचा..अर्जुन सायली जिंकले साक्षी आणि प्रियाला होणारा अटक! Tharala Tar Mag Sakshi Priya Arrested
त्याने सांगितलं की, “प्रेक्षकांप्रमाणेच आम्हालाही मालिका अधिक चांगली करायची इच्छा असते. पण, हे सर्व निर्णय वाहिनी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या संमतीने घेतले जातात. आम्ही कलाकार फक्त त्या निर्णयाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ‘आम्ही कलाकार अत्यंत छोटा भाग आहोत’.”
मालिकेतील एका प्रमुख पात्र रमाशी संबंधित वादावरही Shashank Ketkar ने भाष्य केलं. काही प्रेक्षकांनी विचारलं की, “तुला रमाचं इतकं प्रेम आहे, तरी तू रमाला ओळखू कसं शकला नाहीस?” यावर तो म्हणाला, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा काही टप्प्यांतून जातं जेव्हा वास्तव आणि भ्रम यामधील फरक स्पष्ट दिसत नाही. प्रेम, नातं, जॉब, भांडणं – हे सगळं आयुष्याचं भाग असतं. तसंच रमा-अक्षयचंही आहे.”
त्याच्या म्हणण्यावरून स्पष्ट होतं की, मालिकेतील पात्रं हीदेखील आपल्यासारख्याच प्रवासातून जात असतात. त्यांनी केवळ गोष्ट सांगण्याचं माध्यम म्हणून काम केलं आहे. “गैरसमज निर्माण झालेत, पण ते लवकरच दूर होतील,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
शशांक केतकरचं हे मत सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरत असून, प्रेक्षकांना मालिकेतील बदल समजून घेण्याची एक नवी दृष्टी मिळाली आहे. कलाकाराची ही प्रामाणिक प्रतिक्रिया मालिकेच्या आगामी भागांकडे आणखी उत्सुकतेने पाहायला लावते.
हे पण वाचा..Zee Marathi Serial Off Air Shiva : दीड वर्षांचा प्रवास संपला! ‘शिवा’ मालिका लवकरच घेणार निरोप









