ADVERTISEMENT

भाऊबीजेच्या दिवशी शशांक केतकरने दाखवला लेकीचा चेहरा; राधाच्या क्यूट स्माईलने जिंकली सगळ्यांची मनं

shashank ketkar daughter radha photos viral : अभिनेता शशांक केतकरने पहिल्यांदाच लेकी राधाचा चेहरा दाखवत खास कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. भाऊबीजेच्या निमित्ताने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
shashank ketkar daughter radha photos viral

shashank ketkar daughter radha photos viral : मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारणही खासच आहे — भाऊबीजेच्या दिवशी शशांकने आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवला आहे. या फोटोसोबत केतकर कुटुंबाने दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांनी सोशल मीडियावर आनंदाचा वर्षाव झाला आहे.

शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे यांनी एकत्रित कुटुंबासह चार सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी दोन फोटोमध्ये त्यांचा मोठा मुलगा ऋग्वेद आणि ९ महिन्यांची गोंडस लेक राधा दिसत आहे. एका फोटोमध्ये ऋग्वेद बहिणीला प्रेमाने मांडीवर घेतोय, तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका आणि शशांक दोघंही आपल्या चिमुकल्यांसोबत पोज देताना दिसतात.

शशांकने या फोटोसोबत कॅप्शन दिलं आहे — “आनंदाचं झाड दारी झुलते डहाळी… केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!” या सुंदर शब्दांसोबत शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.

फोटो पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच त्यावर हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झाला. अभिनेत्री मयुरी देशमुख, तितिक्षा तावडे, नंदिता पाटकर, आणि आशुतोष गोखले यांनी रेड हार्ट इमोजी टाकत केतकर कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीसुद्धा “किती गोड राधा!”, “अगदी शशांकची कार्बन कॉपी!”, “नजर लागू नये तुमच्या कुटुंबाला!” अशा प्रेमळ कमेंट्स करत फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शशांक आणि प्रियांकाने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं — मुलगा ऋग्वेद. यावर्षी जानेवारी महिन्यात या जोडप्याने दुसऱ्या बाळाचं म्हणजेच लेक राधा केतकरचं स्वागत करत कुटुंब पूर्ण केलं.

हे पण वाचा.. त्या चर्चा खर्‍या ठरल्या का? एकटीनेच साजरी केली दिवाळी ऐश्वर्या शर्मा पती नीलपासून दुरावल्याच्या चर्चांनी घेतला वेग!

अभिनेता म्हणून ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला Shashank Ketkar आज एक प्रेमळ नवरा आणि जबाबदार बाबा म्हणूनही चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. आता राधाच्या क्यूट हसऱ्या चेहऱ्याने त्याचं हे नवं पितृत्व अधिक सुंदर झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

हे पण वाचा.. “ते मनापासून बोलले म्हणूनच…” मेघा धाडेचा महेश कोठारेंना ठाम पाठिंबा; म्हणाली – ‘त्यांच्या शब्दांत..

shashank ketkar daughter radha photos viral