ADVERTISEMENT

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली–भैरवी आमनेसामने, मालिकेत सुरू झालं गुरू-शिष्य युद्ध

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या आयुष्यातील लपलेलं सत्य उघड झाल्यानंतर कथानकाला नवं वळण मिळालं आहे. भैरवी आणि सावली समोरासमोर येताच मालिकेत मोठा संघर्ष रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ सध्या जबरदस्त वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपासून सावलीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. शांत, संयमी आणि नेहमीच दुसऱ्यांसाठी जगणारी सावली आता पूर्णपणे बदलताना दिसत आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य अखेर जगासमोर आलं असून, त्यानंतर कथानकात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे.

Savalyachi Janu Savali या मालिकेत सावली आणि सारंग ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. सारंगचं सावलीवर असलेलं निस्वार्थ प्रेम नेहमीच लक्ष वेधून घेतं. संपूर्ण जग तिच्या विरोधात गेलं, तरी तो खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, याच सावलीने तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं सत्य त्याच्यापासून आणि इतरांपासून लपवून ठेवलं होतं. ती प्रसिद्ध गायिका भैरवी वझेची मुलगी तारा हिच्यासाठी वर्षानुवर्षे गात होती, पण तिची ओळख मात्र समोर येऊ दिली नव्हती.

भैरवीला दिलेल्या वचनामुळे सावली या सगळ्यात अडकली होती. तारा एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळख मिळवत असताना, तिच्या यशामागे सावलीचा आवाज आहे, हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहित होतं. जेव्हा सारंगला या सत्याची जाणीव झाली, तेव्हा त्याने सावलीला तिची खरी ओळख मिळवून देत हे सत्य जगासमोर आणलं. या टप्प्यानंतर Savalyachi Janu Savali मालिकेत खरी नाट्यमय घडामोड सुरू झाली.

आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये भैरवी आणि सावली आमनेसामने येताना दिसतात. भैरवीचा अहंकार आणि सावलीची भक्ती यामधील संघर्ष स्पष्टपणे उभा राहतो. जगन्नाथवर बोट दाखवत भैरवी आपली नाराजी व्यक्त करते, पण त्याच क्षणी सावली ठामपणे तिच्यासमोर उभी राहते. “आता ही सावली बदलली आहे,” असे शब्द वापरत ती भैरवीला थेट आव्हान देते. गुरु-शिष्याचं हे नातं आता संघर्षात बदलणार असल्याचे संकेत या प्रोमोमधून मिळतात.

हे पण वाचा.. टेलिव्हिजन म्हणजे आईसारखं व्यासपीठ मानसी साळवी यांनी व्यक्त केली इंडस्ट्रीतील दुजाभावावर स्पष्ट भूमिका

दरम्यान, जगन्नाथ आणि सावली यांचं नातं मालिकेतील एक भावनिक केंद्रबिंदू ठरलं आहे. वडील-मुलीप्रमाणे असलेलं हे नातं पुढे काय वळण घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. Savalyachi Janu Savali मधील हा नवा ट्विस्ट सावलीच्या आयुष्यातील बदललेली बाजू दाखवणार असून, पुढील भागांमध्ये कथा अधिक रंगतदार होणार हे नक्की.

हे पण वाचा.. स्वानंदीचा मोठा निर्णय! समरच्या आयुष्यात येणार नवं वळण

savalyachi janu savali upcoming twist savali bhairavi