ADVERTISEMENT

“मी त्यांना दाखवून देईन की…” सावलीच्या आयुष्यात शिवानीमुळे नवा वादंग; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत रंगणार मोठा ट्विस्ट

savalyachi janu savali nava twist shivani savali : झी मराठीवरील “Savalyachi Janu Savali” मालिकेत शिवानीच्या कृतीमुळे सावली व सारंगच्या नात्यात नवा तणाव निर्माण झाला आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये सावलीने घेतलेला ठाम निर्णय प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
savalyachi janu savali nava twist shivani savali

savalyachi janu savali nava twist shivani savali : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “Savalyachi Janu Savali” सध्या प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरत आहे. मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट आल्याने कथा अधिक रंगतदार होत चालली आहे. घरातील तणाव, ऐश्वर्याचे कारस्थान आणि तिलोत्तमाचे अनपेक्षित निर्णय यामुळे आधीच सावली व सारंगच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता नवीन पात्र ‘शिवानी’च्या एन्ट्रीमुळे कथेत आणखी गुंतागुंत वाढताना दिसते.

सावली आणि सारंगच्या संसारात शिवानीचे आगमन एक धोक्याची घंटा ठरत आहे. सारंगबद्दल आकर्षण बाळगणारी शिवानी सावलीला असुरक्षित वाटावे यासाठी जाणीवपूर्वक सारंगच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शिवानी म्हणताना दिसते, “जर सावलीला माझ्या आणि सारंगच्या जवळिकीमुळे जळजळ होत असेल, तर मी सारंगला अजून जवळ आणेन.” या शब्दांमुळे कथानकात नवा कलाटणी येणार हे स्पष्ट झाले आहे.

प्रोमोमध्ये आणखी एक ठळक क्षण दाखवण्यात आला आहे. सावली स्वतःशी बोलताना ठामपणे म्हणते, “शिवानी मॅडमनी पुन्हा असं काही केलं तर मी गप्प बसणार नाही. मी त्यांना दाखवून देईन की त्यांची बायको किती डेंजर आहे.” तिच्या या संवादामुळे मालिकेत पुढे काय होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘Savalyachi Janu Savali’ मालिकेतून प्रेक्षकांना कौटुंबिक नाट्य, प्रेम, संघर्ष आणि नात्यांमधील गुंतागुंतीची छटा पाहायला मिळते. आधीच ऐश्वर्या आणि तारा मिळून सावलीविरुद्ध कारस्थानं रचताना दिसतात. आता त्यात शिवानीचे आगमन झाल्याने सावलीच्या आयुष्यावर आणखी संकटं ओढावणार आहेत.

हे पण वाचा.. महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे निधन; मुलगा सत्याची भावुक पोस्ट

झी मराठीने या प्रोमोसोबत विचारलेला प्रश्न – “शिवानीमुळे सावलीपासून दुरावणार का सारंग?” – हा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. पुढील भागांमध्ये सावली कोणता निर्णय घेते, शिवानीच्या डावाला कसं उत्तर देते आणि सारंग तिच्या पाठीशी उभा राहतो का, हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

हे पण वाचा.. रुपाली भोसलेच्या नव्या मर्सिडीजचा अपघात; अभिनेत्री म्हणाली, “आजचा दिवस खूप वाईट…

savalyachi janu savali nava twist shivani savali