savalyachi janu savali bhairavi vs savli new twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Savalyachi Janu Savali सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गुरू-शिष्याच्या नात्यातील संघर्ष, संगीताची परंपरा आणि सूडाची भावना यांचा मेळ या मालिकेत सातत्याने पाहायला मिळतो. अलीकडील भागांमध्ये भैरवीचा खोटेपणा उघडकीस आल्यानंतर कथानकाने अधिक वेग घेतला आहे. वझे घराण्याची गाण्याची परंपरा टिकवण्यासाठी भैरवीने अनेक वर्षे सावलीचा आवाज वापरला, मात्र जगासमोर ताराला गायिका म्हणून पुढे केलं, हे सत्य समोर आल्याने भैरवी पूर्णपणे एकटी पडली.
सारंगने धैर्याने सत्य मांडल्यानंतर भैरवीच्या आयुष्यात मोठा बदल झाला. तिने आपला साजशृंगार सोडला, स्वतःला जगापासून दूर ठेवलं आणि सावली, सारंग तसेच इतर सगळ्यांकडून बदला घेण्याचा निश्चय केला. Savalyachi Janu Savali मध्ये याआधीही भैरवीने अनेक डाव आखले, मात्र सावली आणि सारंग यांनी ते उधळून लावले. आता मात्र भैरवीने थेट सावलीच्या आवाजालाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये भैरवी आणि सावली एकाच मंचावर उभ्या असल्याचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. जुगलबंदीच्या निमित्ताने गुरू आणि शिष्य आमनेसामने येणार असताना, भैरवीने अत्यंत धक्कादायक कारस्थान केल्याचं समोर येतं. सावली गाणं गाण्यापूर्वी पाणी पिते आणि त्याच क्षणी भैरवीने रचलेला डाव उघड होतो. सावलीच्या वहिनीच्या मदतीने तिच्या पाण्यात औषध मिसळण्यात आलं असल्याचं प्रोमोमध्ये सूचित केलं आहे, जेणेकरून सावलीला गाताच येऊ नये.
भैरवीचं गाणं संपल्यानंतर जेव्हा ती सावलीला मंचावर गाण्यास सांगते, तेव्हा सावलीचा आवाज साथ देत नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ‘गळ्यातून सूर फुटत नाहीत का?’ असा टोमणा भैरवी मारते. हे दृश्य पाहून सारंग, त्याचे आई-वडील आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसते. Savalyachi Janu Savali चा हा प्रोमो पाहून प्रेक्षकही अस्वस्थ झाले असून, पुढे काय होणार याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हे पण वाचा.. Mi Savitribai Jotirao Phule: जोतीराव-सावित्रीचा ऐतिहासिक विवाह, मालिकेत रंगणार परंपरा, संघर्ष आणि भावनांचा संगम
सावली खरंच पराभूत होणार की या संकटावर मात करणार? भैरवीचा हा कट यशस्वी ठरणार का, आणि सारंग या सगळ्यावर कसा तोडगा काढणार, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. Savalyachi Janu Savali मधील हा नवा ट्विस्ट मालिकेला आणखी रंगतदार बनवणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag: कोर्टात अर्जुनची कोंडी, महिपतची पलटी; नागराजला बेल मिळण्याची दाट शक्यता







