गणेशोत्सव म्हणजे आनंद, भक्ती आणि कौटुंबिक एकत्रिततेचा उत्सव. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याच्या घरी दरवर्षी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन होतं. यंदाही संतोष आणि त्याच्या कुटुंबीयांनी बाप्पाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने केलं आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संतोषसोबत त्याच्या आईनेही मनमोकळं बोलत लेकाचं भरभरून कौतुक केलं.
Santosh Juvekar च्या आईने अभिमानाने सांगितलं की, “आज गावाकडे गेले की लोक मला म्हणतात – लताचा मुलगा इतका मोठा झाला. लोकं म्हणतात तू मुलाला घडवलंस, पण खरं सांगायचं तर त्याने स्वतः स्वतःला घडवलं. त्याने आपल्या आवडीसाठी झगडलं. मोठ्या नोकऱ्यांच्या संधी असूनही त्याने त्या स्वीकारल्या नाहीत. त्याचा आग्रह होता की मला फक्त अभिनयातच पुढे जायचं आहे. आज त्याने आमचं नाव मोठं केलंय.”
या संवादात आईने आणखी एक महत्त्वाची इच्छा व्यक्त केली. “मी बाप्पाकडे एवढंच मागितलंय की २०२५ मध्ये माझ्या मुलाला छावासारखा मोठा रोल मिळावा. लहानसहान भूमिका त्याला मिळतच असतात, पण जसा हिंदी छावा सिनेमात तो झळकला, तसा प्रभावी आणि मोठा रोल पुन्हा त्याच्या वाट्याला यावा,” असं म्हणत त्यांनी लेकासाठी प्रार्थना केली.
Santosh Juvekar हा आपल्या अभिनयातून घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. ‘झेंडा’ आणि ‘मोरया’ यांसारख्या चित्रपटांनी त्याला प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान दिलं. विशेष म्हणजे हिंदी ‘छावा’ सिनेमामुळे संतोष प्रकाशझोतात आला. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका विशेष गाजली. मात्र, त्यानंतर दिलेल्या मुलाखतीतील काही वक्तव्यांमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. तरीही त्याने अभिनयावरील एकनिष्ठता कायम ठेवली.
गेल्या दोन दशकांपासून Santosh Juvekar सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्याने केलेली विविध व्यक्तिरेखा रसिकांच्या लक्षात राहिल्या आहेत. त्याचा अभिनय कौशल्यपूर्ण आणि वास्तवदर्शी असल्यामुळे त्याच्याकडून प्रेक्षकांची अपेक्षाही अधिक आहे.
हे पण वाचा.. “जोपर्यंत ठाकरे बंधू स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत…” Sonalee Kulkarni ची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया
आईच्या कौतुकासोबतच तिच्या आशिर्वादाचा सूर ऐकून संतोषच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. चाहत्यांचा विश्वास आहे की येणाऱ्या काळात त्याला पुन्हा एकदा मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांना मोहून टाकण्याची संधी मिळेल.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या या कौटुंबिक संवादातून एक वेगळाच भावनिक क्षण प्रकट झाला. कलाकार म्हणून Santosh Juvekar जितका प्रेक्षकांच्या मनात आहे, तितकाच तो आपल्या आईसाठी अभिमानाचा विषय आहे.
हे पण वाचा..”Prarthana Behere ने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सांगितला अनुभव; “थायलंडला शूटिंगसाठी गेले तेव्हा पाय सुजला”









