sanika kashikar 75 days fitness challenge 2026 : नव्या वर्षाचं स्वागत करताना अनेक जण स्वतःसाठी नवे संकल्प करतात आणि त्याला मनोरंजन विश्वही अपवाद नाही. २०२६ या वर्षात मराठी तसेच हिंदी कलाकारांनी स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. कुणी भूमिकांची निवड अधिक विचारपूर्वक करण्याचा संकल्प केला आहे, तर कुणी प्रवास, काम-आयुष्य समतोल किंवा फिटनेसवर भर देण्याचं ठरवलं आहे. अशातच मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Sanika Kashikar हिनं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून स्वतःला एक मोठं आव्हान दिलं आहे.
Sanika Kashikar हिनं १ जानेवारी २०२६ पासून ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं असून ती या संपूर्ण काळात ठराविक नियमांचं काटेकोर पालन करणार आहे. अभिनयासोबतच सोशल मीडियावर सक्रिय असलेली सानिका तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘काव्यांजली’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. विशेषतः ‘नवरी मिळे हिटलरला’मधील तिच्या सासूबाईंच्या भूमिकेनं तिला घराघरात ओळख मिळवून दिली.
मालिका संपल्यानंतरही Sanika Kashikar चाहत्यांपासून दूर गेलेली नाही. तिचे फोटोशूट्स, डेली व्ह्लॉग्स आणि वैयक्तिक अपडेट्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. याच माध्यमातून तिनं तिच्या ७५ दिवसांच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात जाहीर केली आहे. या चॅलेंजमध्ये रोज इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या व्यायामाचा समावेश आहे. घरात नियमित वर्कआऊटसोबतच बाहेर चालणं, खेळ किंवा ठराविक अंतर पूर्ण करणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग असणार आहे.
फक्त शरीरावरच नाही, तर मनावरही लक्ष देण्याचा Sanika Kashikar चा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या काळात ती दररोज वाचनासाठी वेळ काढणार असून नॉन-फिक्शन पुस्तकांची निवड तिनं केली आहे. त्यासोबतच पुरेसं पाणी पिणं, स्वच्छ आणि संतुलित आहार घेणं, कोणत्याही प्रकारचं व्यसन टाळणं यावरही ती भर देत आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा आहारही दिसून येतो, ज्यामध्ये फ्रेश फळं, सॅलड्स आणि हेल्दी स्मुदीजचा समावेश आहे.
हे पण वाचा.. समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांचा धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल
या चॅलेंजमधील महत्त्वाचा भाग म्हणजे मेडिटेशन. मानसिक शांतता आणि स्थैर्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचं Sanika Kashikar मानते. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य जपण्याचाही तिचा संकल्प आहे.
हे पण वाचा.. Zee Marathi Paaru Serial Update : ‘शुभ श्रावणी’मुळे बदलली ‘पारू’ची वेळ, जाणून घ्या नेमकं काय आहे नवं वेळापत्रक







