ADVERTISEMENT

मराठी अभिनेत्री साक्षी महाजन अडकली लग्नबंधनात; लोकप्रिय अभिनेता अथर्व कर्वेसोबत केला विवाह

sakshi mahajan wedding with atharva karve : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ फेम साक्षी महाजन अखेर विवाहबंधनात अडकली असून, अभिनेत्या अथर्व कर्वेसोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
sakshi mahajan wedding with atharva karve

sakshi mahajan wedding with atharva karve : गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराईचा आनंदी माहोल पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार नव्या आयुष्याची सुरुवात करत असून चाहत्यांमध्येही या आनंदाची चर्चा रंगताना दिसते. अशाच आनंदाच्या वातावरणात आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Sakshi Mahajan हिनेही लग्नबंधनात अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Sakshi Mahajan हिने अभिनेता अथर्व कर्वे याच्यासोबत विवाह केला असून, दोघांचेही लग्न ६ फेब्रुवारी रोजी पार पडले. अभिनेत्रीच्या घरी काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू होती. घाणा भरणे, बांगड्या भरण्याचा विधी, हळद आणि संगीत असे पारंपरिक आणि उत्साही सोहळे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडले. या प्रत्येक क्षणांचे फोटो साक्षीने सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबद्दल उत्सुकता वाढली होती.

लग्नाच्या दिवशी साक्षी आणि अथर्व दोघांनीही अतिशय पारंपरिक आणि देखणा लुक केला होता. Sakshi Mahajan ने ऑफ-व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यावर साजेसे दागिने, केसांत माळलेली अबोली गुलाब आणि साधा पण उठावदार मेकअप यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. तर अथर्व कर्वेने साक्षीच्या साडीशी सुसंगत असा कुर्ता, धोतर आणि डोक्यावर टोपी असा मराठमोळा लूक केला होता. दोघांची जोडी लग्नमंडपात विशेष भावून गेली.

या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे साक्षी आणि अथर्वला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे दोघांनी आपल्या नावांवरून ‘साATH’ असा युनिक हॅशटॅग तयार केला असून, तोही सध्या चर्चेत आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे उपस्थित होते.

साक्षी आणि अथर्व यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची पहिली भेट ‘विठू माऊली’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. याच ठिकाणी त्यांची मैत्री झाली, जी पुढे प्रेमात रूपांतरित झाली. तब्बल सात वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा.. लक्ष्मी निवास फेम अनुज ठाकरेने घेतली आलिशान नवी गाडी; पत्नीसह केली पूजा, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

Sakshi Mahajan च्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि सहकारी कलाकारांकडून मनापासून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या आयुष्यातील हा नवा अध्याय आनंदाने आणि प्रेमाने भरलेला ठरो, अशीच सर्वांची भावना आहे.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag : साक्षी जिवंत असल्याचं सायलीला कळलं, ब्रेकफास्ट डेटवरच मोठा धक्का

sakshi mahajan wedding with atharva karve