Sai Tamhankar bollywood marathi bold scene karier maryada mokale vichar : मराठी चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी आणि इतर भाषिक सिनेमांपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री Sai Tamhankar ही नेहमीच बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत राहिली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या बोल्ड सीनविषयी आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया याबाबत मोकळेपणाने मत मांडलं.
सई ताम्हणकर हिच्या ‘नो एन्ट्री – पुढे धोका आहे’ या चित्रपटातील बिकिनी सीनमुळे त्या काळी मोठा गदारोळ झाला होता. अनेकांसाठी तो प्रसंग धक्कादायक होता, मात्र सईसाठी तो तिच्या कामाचा एक भाग होता. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी स्विमिंग करताना स्विमसूट घालणं हे खूप नैसर्गिक आहे. पण लोकांसाठी तो बोल्ड सीन ठरला. खरं म्हणजे तो प्रसंग माझ्या करिअरच्या प्रवासातील एक टप्पा होता आणि पुढे जाण्यासाठी ही सीमा मोडणं आवश्यक होतं.”
‘हंटर’ चित्रपटातील बोल्ड भूमिकेबद्दल आणि किसिंग सीनबाबतही सईनं स्पष्ट भूमिका मांडली. “जर सतत ‘लोक काय म्हणतील?’ असा विचार करणार असाल, तर अभिनेत्री म्हणून प्रगती होणं अशक्य आहे. प्रत्येक कलाकाराला आपलं काम स्वीकारण्याची हिंमत ठेवावी लागते. माझ्यासाठी हे सर्व सीन हे केवळ भूमिकेचा भाग होते, वैयक्तिक धाडस नव्हतं,” असं ती म्हणाली.
हे पण वाचा.. “रुचा केळकर ने वडिलांसाठी दिली अनोखी भेट; बालपणीच्या बकेट लिस्टमधला किस्सा शेअर करत भावूक पोस्ट”
सई ताम्हणकरने २००८ मध्ये ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि त्याच वर्षी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘दुनियादारी’, ‘हंटर’, ‘गुलकंद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली. मराठीसह हिंदी, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम करून तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या Saie Tamhankar ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत असून, तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे ती सतत चर्चेत आहे.
सईच्या म्हणण्यानुसार, “करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा मोडाव्या लागतात. बोल्ड सीन हा केवळ अभिनयाचा भाग आहे, त्याला वेगळं रंगवणं चुकीचं आहे.” तिचा हा दृष्टिकोन आजच्या पिढीतील अनेक नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरतोय.
हे पण वाचा.. “७ वर्षांचा संघर्ष… काम न मिळाल्याने घरातच बसावं लागलं” – करण टॅक्करची मनाला भिडणारी कबुली









