“Sachin Pilgaonkar” यांचं लेकीवर कौतुक, म्हणाले – ‘तू दाखवून दिलंस कलाकाराचं खरं सामर्थ्य!
मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते Sachin Pilgaonkar हे त्यांच्या अभिनयासोबतच कुटुंबप्रेमासाठीही ओळखले जातात. त्यांच्या लेकीची यशस्वी कारकीर्द पाहून त्यांनी नुकतंच तिच्या कामाबद्दल सोशल मीडियावर खास भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मंडला मर्डर्स‘ या ओटीटीवर आलेल्या वेब सिरीजमधील श्रिया पिळगांवकर हिच्या कामाची त्यांनी भरभरून प्रशंसा केली आहे.
हे पण वाचा ..“Tharla Tar Mag” मालिकेची आजीला भुरळ; अभिनेत्री अदिती द्रविडच्या आजीची ‘स्टार प्रवाह’कडे खास मागणी!
Sachin Pilgaonkar आणि सुप्रिया पिळगांवकर या जोडीनं अभिनय क्षेत्रात आपल्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनयाचा वारसा आता त्यांच्या लेकीनेही पुढे चालवला आहे. श्रियाने हिंदी आणि मराठी वेब सिरीज, चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्समधून आपली कला सिद्ध केली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली ‘मंडला मर्डर्स‘ ही वेब सिरीज पाहून सचिन यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी तिच्या भूमिकेचं मनापासून कौतुक केलं आहे
सचिन यांनी इंस्टाग्रामवर श्रियाच्या वेब सिरीजमधील काही फोटो शेअर करत लिहिलं, “तुला मिळणारं प्रेम पाहून आम्हाला खूप आनंद होतोय. तुझ्या प्रत्येक भूमिकेतून तुझं कलाकार म्हणूनचं सामर्थ्य दिसतं. ‘मंडला मर्डर्स’मध्ये साकारलेली ‘रुक्मिणी’ ही तुझी भूमिका इतर भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि विशेष आहे.”
या पोस्टमध्ये त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “तू दाखवून दिलंस की फक्त काही दृश्यांमधूनसुद्धा एक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करू शकतो.” या शब्दांत त्यांनी एका वडिलांचा अभिमान व्यक्त केला आहे. सुप्रिया पिळगांवकर यांचीही प्रतिक्रिया यामध्ये समाविष्ट असून, त्यांच्या दोघांचं श्रियावरचं प्रेम आणि अभिमान या पोस्टमधून स्पष्ट दिसतं.
श्रिया पिळगांवकर हिने ‘मंडला मर्डर्स‘ व्यतिरिक्त ‘मिर्झापूर‘, ‘गिल्टी माइंड्स‘, ‘द ब्रोकन न्यूज‘, ‘ताजा खबर‘ यांसारख्या वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. तिच्या चित्रपटांमध्ये ‘फॅन‘, ‘भांगरा पा ले‘, ‘हाथी मेरे साथी‘ अशा बॉलीवूड प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. अभिनयासोबतच तिनं शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शनही केलं आहे.
मुलीच्या प्रत्येक टप्प्यावर अभिमानाने उभं राहणं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं, आणि Sachin Pilgaonkar यांनी त्यातून एक सुंदर उदाहरण उभं केलं आहे. अभिनयातील तिचं सातत्य, विविध भूमिका साकारण्याची तिची क्षमता आणि मेहनतीची झलक पाहता, श्रिया पिळगांवकर हे नाव भविष्यात अजून मोठं होणार, हे नक्की.
हे पण वाचा.. “महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या!” – Dhananjay Powar चा भावनिक साद;नांदणी गावात शोककळा







