rutuja bagwe thane ghodbunder road post : मुंबई आणि ठाणे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन गोष्ट नाही. पावसाळा संपला की पुन्हा नव्याने खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहते, आणि वाहनचालकांपासून ते पादचारी नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ठाणे-घोडबंदर रोडची अवस्था तर दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांनाच नव्हे, तर कलाकारांनाही आता चांगलाच त्रास होऊ लागला आहे.
अनेक मराठी कलाकारांनी या रस्त्याबाबत वेळोवेळी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, सुरभी भावे यांच्यासह अनेकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मात्र या तक्रारींनंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही.
आता या यादीत अभिनेत्री Rutuja Bagwe हिचे नावही समाविष्ट झाले आहे. ऋतुजा बागवे हिने नुकताच ठाणे-घोडबंदर रोडचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, त्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि खराब झालेली स्थिती स्पष्टपणे दिसून येते.
या व्हिडीओसोबतच ऋतुजाने खोचक भाषेत लिहिले आहे, “अत्यंत सुंदर रस्ता, घोडबंदर रोड!” तसेच आमदार प्रताप सरनाईकांचा उल्लेख करत तिने “पाठीचा मणका अजून शाबूत आहे म्हणून साष्टांग नमन!” अशी टिप्पणी केली आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून अनेकांनी तिच्या धाडसी प्रतिक्रियेला पाठिंबा दिला आहे.
ऋतुजा बागवे ही मराठीसह हिंदी मालिकांमध्येही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘स्वामिनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच हिंदी मालिकेत ‘माटी से बंधी डोर’ मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली होती.
हे पण वाचा.. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ फेम समृद्धी केळकर ने सांगितली आईच्या दागिन्यांशी जोडलेली भावनिक कथा
कलाक्षेत्रातील यशानंतर ऋतुजाने अलीकडेच व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने अंधेरी पूर्व परिसरात स्वतःचं ‘फूडचं पाऊल’ नावाचं रेस्टॉरंट सुरू करून नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
तिच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कलाकारांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
हे पण वाचा.. “मराठी कलाकारांसाठी संघर्ष वाढतोय; काम आणि संधी कमी झाल्याचं धनंजय पोवारचं स्पष्ट मत”
rutuja bagwe thane ghodbunder road post










