Rupali Bhosle supports Rakesh Bapat amid major controversy : बिग बॉस मराठी ६ चा दुसरा आठवडा सुरू होताच घरात मोठा वाद उफाळून आला असून त्याची चर्चा आता घराबाहेरही रंगू लागली आहे. राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात झालेल्या वादामुळे संपूर्ण घराचं वातावरण तणावपूर्ण झालं. एका प्रसंगात राकेशने अनुश्रीचा हात धरून तिला बेडवरून उठवल्याचा मुद्दा पुढे आला आणि यावरूनच दोघांमध्ये तीव्र वाद झाला. अनुश्रीने यानंतर राकेशवर गंभीर आरोप केले, तर रुचिता जामदारनेही या प्रकरणात उडी घेत राकेशने परवानगीशिवाय हात लावल्याचा आरोप केला.
या आरोपांनंतर घरातील वातावरण चांगलंच तापलं. राकेशवर झालेले आरोप ऐकून तो भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचं घरात स्पष्टपणे दिसत होतं. काही स्पर्धकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तर सागर कारंडेने राकेशची बाजू घेत अनुश्रीला समज दिली. हा संपूर्ण प्रकार प्रेक्षकांसाठीही धक्कादायक ठरला असून सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
या वादावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून आता अभिनेत्री Rupali Bhosle हिनेही या प्रकरणावर उघडपणे मत मांडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत Rupali Bhosle यांनी राकेश बापटची बाजू घेतली आणि सागर कारंडेचंही कौतुक केलं. त्यांच्या पोस्टमधील शब्दांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. राकेशला उद्देशून तिने तो एक जेंटलमन असल्याचं सांगितलं असून, इतक्या कठीण परिस्थितीतही त्याने संयम राखल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. तसेच या प्रकरणात राकेशसोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल सागर कारंडेलाही तिने ‘रिस्पेक्ट’ दिला आहे.
दरम्यान, आरोपांनंतर रुचिताने आपण कोणाचं कॅरेक्टर डागाळलेलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं. मात्र टास्कदरम्यानही राकेश आणि अनुश्रीमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा विषय अजूनही संपलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
हे पण वाचा.. अभिनेता सिद्धार्थ खिरीडच्या घरी लग्नाची लगबग, मेहंदी सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल
आता प्रेक्षकांचं लक्ष ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागाकडे लागलं आहे. सूत्रसंचालक रितेश देशमुख या संपूर्ण प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेतात, आणि रुचिता व अनुश्रीची कानउघाडणी करतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. Bigg Boss Marathi 6 मध्ये हा वाद पुढे काय वळण घेणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. देवमाणूसचा आगामी ट्विस्ट आर्याचा मृतदेह फ्रीजमध्ये! जामकर गोपाळपर्यंत पोहोचणार का?
Rupali Bhosle supports Rakesh Bapat amid major controversy








