ADVERTISEMENT

पहिल्यांदाच गोव्यात पोहोचली मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ruchira jadhav first domestic trip goa : मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव पहिल्यांदाच गोव्याला पोहोचली असून तिच्या व्हेकेशन फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे. ग्लॅमरस लूक, खास कॅप्शन आणि गोव्याचा अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
ruchira jadhav first domestic trip goa

ruchira jadhav first domestic trip goa : गोवा म्हटलं की समुद्रकिनारे, मोकळं वातावरण आणि सेलिब्रिटींची गर्दी हे चित्र डोळ्यासमोर येतं. अनेक कलाकारांसाठी गोवा हे कायमचं फेव्हरेट ठिकाण असतं. अशातच मराठी अभिनेत्री Ruchira Jadhav हिनं नुकताच तिचा पहिलावहिला गोवा ट्रिपचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला असून तिच्या पोस्ट्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

विशेष बाब म्हणजे Ruchira Jadhav ही पहिल्यांदाच गोव्याला गेली आहे. तिनं स्वतः याबाबत कॅप्शनमधून खुलासा केला असून, आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिप्स केल्यानंतर अखेर तिची पहिली डोमेस्टिक ट्रिप गोव्याची असल्याचं तिनं मजेशीर पद्धतीनं सांगितलं आहे. “वेलकम टू गोवा सिंघम” असं कॅप्शन देत तिनं शेअर केलेले फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

गोव्यातील विविध ठिकाणांहून Ruchira Jadhav हिनं फोटो पोस्ट केले असून प्रत्येक फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास आणि स्टायलिश अंदाज दिसून येतो. निऑन ग्रीन रंगाच्या स्कीन-टाईट शॉर्ट वनपीसमधील तिचा ग्लॅमरस लूक सध्या चर्चेत आहे. डोक्यावर हॅट, पायात स्लीपर आणि पार्श्वभूमीला समुद्र असं संपूर्ण गोवा व्हायब असलेलं फोटोशूट तिनं केलं आहे. या फोटोंमधून तिची फॅशन सेन्स पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

फक्त ग्लॅमरच नाही तर Ruchira Jadhav हिनं गोव्यातील सांस्कृतिक बाजूही अनुभवली. तिनं प्रसिद्ध मंगेशी मंदिराला भेट दिल्याचे फोटोही शेअर केले आहेत. गुलाबी कुर्ता, निळी जीन्स आणि कानात झुमके असा साधा पण आकर्षक लूक तिनं निवडला असून, या लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसत आहे.

गोव्यातील शॉपिंग, स्थानिक खाद्यपदार्थ आणि तिथलं मोकळं वातावरण याचा तिनं मनमुराद आनंद घेतला. या सगळ्या क्षणांची झलक तिनं सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवली आहे. तिच्या पोस्ट्सवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, अनेकांनी तिच्या पहिल्या गोवा ट्रिपसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

हे पण वाचा.. लाडका भाऊ योजना सुरू? रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर दिव्या शिंदेला दाखवला आरसा

एकूणच Ruchira Jadhav ची ही पहिली डोमेस्टिक ट्रिप खास ठरली असून, तिच्या गोवा व्हेकेशनमधील फोटो आणि कॅप्शनमुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. गोव्याची बातच काही और असते, हे तिनं तिच्या स्टाईलमध्ये दाखवून दिलं आहे.

हे पण वाचा.. मुलीच्या भवितव्याची काळजी ‘लाईटली’ घ्या” ‘लक्ष्मी निवास’ फेम हर्षदा खानिलकरचा महिलांसाठी खास सल्ला

ruchira jadhav first domestic trip goa