ADVERTISEMENT

भाजी-भाकरी, नारळपाणी आणि मेथीचा लाडू; ‘असं’ आहे अभिनेत्री रुचिरा जाधवचं फिटनेसचं रहस्य!

ruchira jadhav diet and fitness secrets : मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव तिच्या सुंदर लूकसाठी आणि तंदुरुस्त शरीरयष्टीसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या डाएट प्लॅन आणि फिटनेसच्या सवयींबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
ruchira jadhav diet and fitness secrets

ruchira jadhav diet and fitness secrets : मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) केवळ तिच्या भूमिकांमुळेच नव्हे, तर तिच्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही चर्चेत असते. सध्या ती ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण अभिनयाइतकंच ती तिच्या आरोग्याबद्दलही जागरूक आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या डाएट प्लॅन आणि फिटनेसबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

रुचिरा म्हणाली की, “माझ्या फिटनेसचं खरं रहस्य म्हणजे आईच्या हातचं घरचं जेवण.” ती रोज सेटवर स्वतःचा डबा घेऊन जाते आणि तिथे सगळ्यांसोबत बसून जेवणाचा आनंद घेते. “मी जगात कुठेही गेले तरी भाजी-भाकरीशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही,” असं ती हसत म्हणाली. त्यासोबतच ती सलाड, पनीर आणि घरगुती पदार्थ खायला प्राधान्य देते.

ती पुढे सांगते, “मी रोज नारळपाणी पिते आणि फळं खाते. सकाळचा नाश्ता मी भरपूर करते आणि दुपारनंतर हलकं खाण्याचा प्रयत्न करते.” तिच्या म्हणण्यानुसार, ती ठरवून डाएट करत नाही; उलट तिला जेवणात विविधता आवडते. “मी ओट्स खाते, चिया सीड्स पाण्यात टाकून पिते आणि कधी तुळशीचं पाणीही घेते. आईने बनवलेले मेथीचे लाडू माझ्या रोजच्या आहाराचा भाग आहेत,” असं ती म्हणाली.

रुचिरा जाधवला कॉफीचीही विशेष आवड आहे. “सकाळी चहा आणि संध्याकाळी कॉफी ही माझी सवय झाली आहे. माझ्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफींचं कलेक्शन आहे,” असं ती सांगते. अभिनय आणि शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही ती योगा आणि व्यायामासाठी वेळ काढते. “मी दहावीपासून योगा करतेय. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतं,” असं ती म्हणाली.

तिच्या मते, तुम्ही काय खाता याचा परिणाम त्वचेवर आणि उर्जेवर दिसून येतो. म्हणूनच ती बाहेरचं अन्न टाळते आणि घरचं पौष्टिक जेवण पसंत करते. “मला इंद्रायणी भात खूप आवडतो. माझ्या घरच्यांना फारसा आवडत नाही, पण माझ्यासाठी तो खास बनवला जातो,” असं ती हसत म्हणाली.

हे पण वाचा.. संकर्षण कऱ्हाडेची पुण्यात खास भेट; प्रशांत दामलेंच्या उत्तराने जिंकली साऱ्यांची मनं

अशा या साध्या आणि नैसर्गिक जीवनशैलीमुळे रुचिरा जाधव आज अनेकांसाठी फिटनेसची प्रेरणा ठरत आहे. तिचं रहस्य साधं असलं, तरी त्यामागचं सातत्य आणि घरगुती प्रेम हेच तिच्या सौंदर्याचं आणि तंदुरुस्तीचं खरं गमक आहे.

हे पण वाचा.. डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गरोदर; अभिनेता अक्षय वाघमारे होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ruchira jadhav diet and fitness secrets