romantic shooting behind scenes girija oak revelation : अभिनयाच्या जगात पडद्यावर दिसणाऱ्या भावना जशा जिवंत भासतात, तशा त्या प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान नसतात. रोमँटिक किंवा इंटीमेट दृश्यांबद्दल अनेकांना विशेष उत्सुकता असते. पण या सगळ्यामागे चालणारी वास्तविक प्रक्रिया किती वेगळी असते, याचा अनुभव स्वतः गिरिजा ओक (Girija Oak) ने उलगडून सांगितला आहे. अलीकडे दिलेल्या मुलाखतीत तिने अशा दृश्यांच्या शूटिंगदरम्यान कलाकारांची मानसिक स्थिती, सेटवरील वातावरण आणि पडद्यामागचा तांत्रिक गोंधळ याबद्दल मनमोकळेपणाने बोलले.
गिरिजा ओक सांगते की, रोमँटिक सीन म्हटलं की लोकांच्या मनात एक सुंदर, शांत वातावरणाची प्रतिमा तयार होते. पण प्रत्यक्ष सेटवर परिस्थिती अगदी उलट असते. किमान शंभराहून अधिक लोकांच्या नजरांमध्ये कलाकारांना भावनिक सीन सादर करावे लागतात. आवाज कमी यावा म्हणून सेटवरील एसी बंद केले जातात, ज्यामुळे कलाकारांना सतत घाम येत असतो. कुणी ड्रायरने हवा देत असतो, कुणी थर्माकोलने चेहऱ्यावर प्रकाश व्यवस्थित पडेल याची खबरदारी घेत असतो, तर मेकअप आणि हेअर टीम क्षणाक्षणाला दुरुस्ती करत असतात.
ती म्हणते, “अशा वातावरणात खरी रोमँटिक भावना निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही ज्या गोष्टी स्क्रीनवर पाहता, त्यामागे भावनांपेक्षा तांत्रिक गणित जास्त असतं.” गिरिजा ओक चा किसिंग सीनबद्दलचा खुलासा तर आणखी मजेदार आहे. तिच्या म्हणण्यानुसार, “स्क्रीनवरील किस प्रत्यक्षात भावना व्यक्त करणारा क्षण नसतो. तो म्हणजे एखाद्या कार्डबोर्डकडे पाहून दिलेला तांत्रिक ऍक्शनसारखा असतो.”
इंटीमेट दृश्यांबद्दल बोलताना गिरिजा ओक ने आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगितली. अनेकदा क्लोज-अप शॉट्समध्ये समोरचा सहकलाकार असतोच असे नाही. “कधी कधी तुम्हाला एका कोपऱ्यातील काळ्या कापडाकडे किंवा लाईट स्टँडकडे बघून संवाद बोलावे लागतात. हे सगळं इतकं यांत्रिक असतं की त्यात रोमान्स नावाची गोष्टच राहत नाही,” ती हसत म्हणाली.
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलेल्या गिरिजा ओक ने या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘तारे जमीन पर’, ‘जवान’, ‘इन्स्पेक्टर झेंडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली. आणि आता पडद्यामागच्या गोष्टींबद्दल तिचा खुला संवाद प्रेक्षकांना या उद्योगाचा नवा चेहरा दाखवतो.
हे पण वाचा.. रिंकू राजगुरूच्या ‘आशा’चा दमदार टीझर प्रदर्शित; १९ डिसेंबरला चित्रपट होणार रिलीज
या स्पष्टवक्तेपणामुळे गिरिजा ओक ने रोमँटिक सीनमागची खरी प्रक्रिया उघड केली असून, पडद्यावर दिसणाऱ्या जादूच्या मागे किती “मेहनत आणि मेकॅनिक्स” दडलेले असतात याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली आहे.
हे पण वाचा.. अप्पी आमची कलेक्टर’ फेम संतोष पाटील यांनी घेतली नवी कार; आनंद व्यक्त करत शेअर केला खास व्हिडीओ









