ADVERTISEMENT

रोहित राऊत झाला भारताचा पहिला आय पॉपस्टार!

rohit raut i popstar winner : रोहित राऊत ने अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवरील ‘आय पॉपस्टार’च्या पहिल्या सीझनचा किताब पटकावत स्वतंत्र पॉप संगीताला नवी दिशा दिली आहे.
rohit raut i popstar winner

rohit raut i popstar winner : अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर दाखल झालेल्या ‘आय पॉपस्टार’ या नव्या म्युझिक रिअॅलिटी शोचा पहिला सीझन अवघ्या काही आठवड्यांत देशभरात स्वतंत्र पॉप संगीताची नवी हवा घेऊन आला. सहा आठवड्यांच्या ऊर्जावान प्रवासानंतर आणि तब्बल ८५ ओरिजनल ट्रॅक्सनंतर अखेर शोची धमाकेदार सांगता झाली. याच निर्णायक क्षणी Rohit Raut ने आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांना मागे टाकत भारताचा पहिला ‘आय पॉपस्टार’ म्हणून बहुमान पटकावला.

अंतिम फेरीत स्टेजवर सादर झालेल्या परफॉर्मन्सनी प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही भारावून टाकलं. टॉप २मध्ये टीम किंगचा रिषभ पांचाल आणि टीम पर्मिशचा Rohit Raut यांचा समावेश होता. कठीण टक्कर दिल्यानंतर रोहितने विजेतेपद आपल्या झोळीत घातलं आणि ७ लाख रुपयांचं बक्षीसही मिळवलं. तर उपविजेता ठरलेल्या रिषभ पांचालला तीन लाखांची बक्षीसरक्कम जाहीर करण्यात आली. दोघांच्या प्रदर्शनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

विजेतेपद मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना Rohit Raut म्हणाला की, या शोने त्याला कलाकार म्हणून स्वतःला नव्याने समजून घेण्याची संधी दिली. “या प्रवासात मी स्वतःचा स्वतंत्र पॉप आवाज शोधण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या परिश्रमाचं फळ मला मिळालं. माझे मेंटॉर परमिश पाजी यांचं मार्गदर्शन आणि चाहत्यांचा विश्वास नसता तर हे शक्यच नव्हतं,” असं सांगत त्याने हे यश सर्व प्रादेशिक कलाकारांना समर्पित केलं जे चौकटीबाहेर जाऊन स्वतःची कला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रोहितच्या यशाबद्दल बोलताना मेंटॉर परमिश वर्मा यांनीही कौतुकाचा वर्षाव केला. “या स्पर्धकांनी दाखवलेलं समर्पण अवर्णनीय आहे. ते इथे आपल्या कलेचं स्थान शोधत आले आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण देशाला आपली ओळख करून दिली. Rohit Raut पहिल्या सीझनचा विजेता ठरल्यानं आम्हाला अभिमान वाटतो,” असे ते म्हणाले. भारतीय प्रेक्षक स्वतंत्र पॉप संगीतासाठी तयार असल्याचा हा पुरावा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं.

हे पण वाचा.. बिग बॉस १९च्या मंचावर सलमानसोबत रितेश देशमुख ची जबरदस्त एन्ट्री; आज होणार बिग बॉस मराठी ६ ची घोषणा?

पहिल्या सीझनच्या यशामुळे ‘आय पॉपस्टार’ने केवळ नवीन आवाजांना संधी दिली नाही, तर रोहितसारख्या स्वतंत्र कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठही मिळवून दिलं आहे. पुढील सीझनमध्ये आणखी किती नवे पॉपस्टार समोर येतील याची उत्सुकता आता वाढली आहे.

हे पण वाचा.. सूरज पारसनीस यांनी जाहीर केलं लेकीचं नाव; नामकरणाचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर

rohit raut i popstar winner