rohit purohit chya gharat chimuklya pahunyalche agman : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता Rohit Purohit आणि त्याची पत्नी अभिनेत्री शीना बजाज यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. लग्नानंतर तब्बल सहा वर्षांनी या जोडप्याच्या घरी बाळाचा जन्म झाला आहे. १५ सप्टेंबर रोजी शीनाने गोंडस मुलाला जन्म दिला असून चाहत्यांपासून ते इंडस्ट्रीतील कलाकारांपर्यंत सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रोहितने स्वतः ही गुड न्यूज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. त्याने इन्स्टाग्रामवर दोन खास फोटो पोस्ट करत “It’s a Boy” असं जाहीर केलं. दुसऱ्या फोटोमध्ये रोहित आणि शीना दोघेही अतिशय आनंदी दिसत होते. काही वेळातच या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडला. रोमित राज पराशर, अनिरुद्ध दवे, समर्थ जुरेल, मयुर मेहतासह अनेक कलाकारांनी रोहित आणि शीनाचे अभिनंदन केलं.
रोहित पुरोहित आणि शीना बजाज यांनी २२ जानेवारी २०१९ रोजी जयपूरमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर त्यांच्या घरी पहिलं बाळ आलं आहे. या आनंदामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य अधिकच रंगतदार झालं आहे.
विशेष म्हणजे, रोहितने यावर्षी मे महिन्यातच आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली होती की तो लवकरच बाबा होणार आहे. योगायोगाने त्याच वेळी तो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अरमान या भूमिकेत दिसत होता, जिथे कथानकातही तो वडील होणार असल्याचा ट्रॅक सुरू होता. ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी घडलेला हा योगायोग चाहत्यांसाठी अधिकच विशेष ठरला.
सध्या सोशल मीडियावर रोहित व शीनाच्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह त्यांचे सहकलाकारही नव्या पालकांना शुभेच्छा देत आहेत. रोहितने आपल्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता तो एका नवीन जबाबदारीत पाऊल टाकत आहे.
लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला असून चाहत्यांसाठी आणि चाहत्यांइतकंच स्वतः रोहित पुरोहित आणि शीना बजाजसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला आहे.
हे पण वाचा.. “‘“‘वहिनी आल्या का?’ नेटकऱ्यांचा प्रश्न; शेजारी उभी ‘ती’ कोण Suraj Chavanचा फोटो व्हायरल”









