‘ठरलं तर मग’ मालिकेतील चाहत्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर खास आनंदाची बातमी आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही भूमिका आता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी साकारत आहेत.
नवीन प्रोमोमध्ये रोहिणी हटंगडी पूर्णा आजीच्या रुपात सुभेदारांच्या घरात एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळते. या एन्ट्रीबद्दल त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ज्योती माझी खूप जवळची मैत्रीण होती. १९६५ पासून आमची ओळख आहे. त्यांची कामगिरी मी नेहमीच कौतुकाने पाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर ही भूमिका साकारण्याचा प्रस्ताव आल्यावर मनात मिश्र भावना होत्या. ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे.”
रोहिणी हटंगडी यांनी पुढे सांगितले की, “कधीच रिप्लेसमेंट भूमिका करण्याचा अनुभव मला नव्हता. कारण, आधीच्या कलाकाराने भूमिकेला एक खास स्तरावर पोहोचवलेले असते, त्यापासून पुढे जाणे आव्हानात्मक असते. मात्र मला प्रेक्षक तितक्याच प्रेमाने स्वीकारतील अशी आशा ठेवते. माझा प्रयत्न असेल की पूर्णा आजीची भूमिका पूर्वीपेक्षा कमी नाही, तर अधिक प्रभावी दिसेल.”
दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवण्यात येणाऱ्या सीनमध्ये सायलीच्या आई-बाबांना घराबाहेर हाकलणाऱ्या प्रियाला पूर्णा आजी कठोर धडा शिकवणार आहे. या सीनमध्ये आजी पुन्हा एकदा सर्वांसमोर प्रियाला कानशिलात शिकवताना दिसणार आहेत. या एन्ट्रीमुळे मालिकेत नवीन रंग आणि रोमांच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
हे पण वाचा..मराठमोळ्या मंजिरी ओकची केदारनाथला भेट; भाऊबीजेच्या दिवशी मंदिराचे दरवाजे होणार बंद
‘ठरलं तर मग’ मालिकेचे चाहत्यांनी नवीन पूर्णा आजीच्या भूमिकेला खूप अपेक्षा ठेवलेली आहेत. रोहिणी हटंगडीच्या अनुभव आणि अभिनयामुळे ही भूमिका लवकरच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करेल, असा विश्वास आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग’मध्ये ‘पूर्णा आजी’च्या भूमिकेत रोहिणी हटंगडी; जुई गडकरी भावनिक









