ADVERTISEMENT

“मी लग्न करेन तेव्हा सगळ्यांना सांगेन” – कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोवर Rinku Rajguru ची पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे Rinku Rajguruच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर रिंकूने या चर्चांवर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत स्पष्ट सांगितलं की, “मी लग्न करेन तेव्हा सगळ्यांना स्वतः कळवेन.”
Rinku Rajguru

सैराट’ चित्रपटातून अर्चीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आजही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांची नजर असते. काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर झळकला आणि काही क्षणांतच तो व्हायरल झाला. या फोटोमुळे त्यांच्या नात्याबाबत आणि लग्नाविषयी अफवा पसरू लागल्या. अखेर स्वतः Rinku Rajguru ने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

हा फोटो कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला होता. त्यात त्यांनी रिंकूसोबत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा क्षण शेअर केला होता. या पोस्टला मिळालेल्या लक्षामुळे Rinku Rajguru आणि कृष्णराज महाडिक यांचं नाव एकत्र जोडण्यात आलं. मात्र या चर्चांना आता Rinku Rajguru ने पूर्णविराम दिला आहे.

एका मुलाखतीत Rinku Rajguru म्हणाली, “मी तो फोटो शेअर केलाच नव्हता. आपण जेव्हा कुठेही जातो, तिथे फोटो काढले जातात. तो फोटो त्यांच्या टीमने काढून टाकला होता. त्यामुळे त्याची इतकी चर्चा होणं खरंच गरजेचं नाही.”

Rinku Rajguru ने पुढे लग्नाविषयीही स्पष्ट मत मांडले. “मी लग्न करेन तेव्हा मी स्वतः सगळ्यांना सांगेन. अशा प्रकारच्या अफवा माझ्या आयुष्यात आधीही अनेकदा पसरल्या आहेत. त्यामुळे आता त्यांचा फारसा त्रास होत नाही,” असे ती म्हणाली.

दरम्यान, कृष्णराज महाडिक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. लोकांना जे वाटतंय, तसं काही नाही.”

हे पण वाचा.. “जोपर्यंत ठाकरे बंधू स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत…” Sonalee Kulkarni ची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया

Rinku Rajguru च्या करिअरकडे पाहिलं तर ‘सैराट’ नंतर तिचं नाव मोठ्या पडद्यावर तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही झळकले आहे. अर्चीच्या भूमिकेमुळे तिला मिळालेली लोकप्रियता आजही कायम आहे. चाहत्यांच्या मनात ती ‘नेक्स्ट डोअर गर्ल’ म्हणून ओळखली जाते.

लग्नाविषयीच्या चर्चेबाबत Rinku Rajguru ने दिलेल्या प्रतिक्रियेनं तिच्या चाहत्यांना दिलासा मिळालाय. तिच्या शब्दांतला आत्मविश्वास स्पष्ट दिसतो की ती आपलं वैयक्तिक आयुष्य स्वतः ठरवेल आणि योग्य वेळ आल्यावरच सगळ्यांना कळवेल.

हे पण वाचा.. गणेश चतुर्थीला Hruta Durgule हिच्या घरी आली आलिशान BMW, फोटो शेअर करत दिली खुशखबर

Rinku Rajguru इंस्टाग्राम पोस्ट..