२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आर्चीच्या भूमिकेतून तिने पहिल्याच चित्रपटात लोकांच्या मनावर आपली अमिट छाप सोडली. या चित्रपटातूनच तिला आणि अभिनेता आकाश ठोसर (Aakash Thosar) ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आर्ची आणि परशाची जोडी आजही चाहत्यांच्या चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Rinku Rajguru ने आकाश ठोसरसोबतच्या मैत्रीबद्दल आणि इतर कलाकारांबरोबरच्या नात्यांबद्दल मनमोकळं वक्तव्य केलं आहे.
Rinku Rajguru म्हणाली की, “सैराटच्या काळापासून आमची मैत्री आहे आणि ती आजही तितकीच घट्ट आहे. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात असतो. कधी मी त्याला फोन करून म्हणते की मला बोअर होतंय, चल मुंबईला ये आणि आपण एखादा शो बघू. किंवा मी पुण्याला गेले की आम्ही कॅफेत बसून गप्पा मारतो, नवीन चित्रपट पाहिलास का, पुस्तक वाचलंस का असं विचारतो. आम्ही एकमेकांना मुलाखतीही सुचवत असतो. त्यामुळे आमच्यातली पारदर्शकता आणि संवाद कायम टिकून आहे.”
Rinku Rajguru ने पुढे इंडस्ट्रीतील इतर कलाकारांबद्दलही सांगितलं. “मी वयाने सर्वांत लहान असल्यामुळे ज्या सेटवर गेले तिथे मला नेहमी लाड मिळाले. भरत जाधव सर तर मला वडिलांसारखे वाटतात. ते खूप मार्गदर्शन करतात आणि कधी काम आवडलं की कौतुकही करतात. सिद्धार्थ जाधवसोबत तर खास आठवणी आहेत. सेटवर आम्हाला ‘खारी-बिस्किट’ म्हणायचे. नुकतंच आम्ही पहिल्यांदाच एकत्र राखी साजरी केली. अशा लोकांमुळे इंडस्ट्री कुटुंबासारखी वाटते,” असं Rinku Rajguru ने सांगितलं.
हे पण वाचा.. मराठा आरक्षण आंदोलनावर Riteish Deshmukh ची पोस्ट; म्हणाला..मनोज जरांगेंच्या..
अभिनेत्री Rinku Rajguru ने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच ती ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरेसोबत झळकली. या चित्रपटात तिची व्यक्तिरेखा आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं पाहायला मिळालं. प्रेक्षकांनीही या प्रयोगाचं कौतुक केलं आहे.
सध्या Rinku Rajguru च्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती लवकरच नवे चित्रपट किंवा वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आत्तापुरतं तिच्या या candid मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे की आकाश ठोसरसोबतची तिची मैत्री केवळ ‘सैराट’पुरती मर्यादित नसून आजही तितकीच घट्ट आहे.
हे पण वाचा.. “उत्सव मिरवण्याचा नाही, साजरा करण्याचा आहे” : अभिनेता Uday Nene यांची मुंबईच्या गणेशोत्सवावर थेट टीका









