ridhima pandit slams dating rumors : टीव्ही इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली लोकप्रिय अभिनेत्री Ridhima Pandit पुन्हा एकदा चर्चेत आहे. कधी तिच्या भूमिका, तर कधी रिअॅलिटी शोमधील परफॉर्मन्समुळे ती चाहत्यांच्या नजरेत राहिलेली. परंतु यावेळी मात्र कारण पूर्णपणे वेगळं. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडण्यात आलं होतं. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, लवकरच लग्नाचा विचार सुरू आहे अशा अफवा जोरात पसरल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देत रिद्धिमाने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत Ridhima Pandit म्हणाली, “लोक कोणत्या आधारावर अशा गोष्टी लिहितात हे मला कळत नाही. मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही. आयुष्यात कधी भेटदेखील झालेली नाही. एका कार्यक्रमात तो उपस्थित होता आणि मीही तिथे होते, पण त्याचा अर्थ असा नाही की आमच्यात काही आहे. पण काहीजणांनी तर एवढंही लिहिलं की प्रसिद्धीसाठी आम्ही हा सगळा खेळ रचलाय.”
तिने पुढे सांगितलं, “माझ्यासाठीच नाही, तर घरच्यांसाठीही ही परिस्थिती त्रासदायक होती. अचानक कुठून तरी असल्या गोष्टी सुरू होतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. क्रिकेटर असल्यामुळे लोक लगेच तिकडे झुकतात, कलाकारांवर मात्र शंका घेतली जाते. पण सत्य हेच आहे की आमच्यात कधी कोणताही संपर्क नव्हता आणि नाही.”
हे पण वाचा.. करिअरनंतर आता कुटुंबावर फोकस! दिव्यांका त्रिपाठी कडून गुड न्यूज ची हिंट
रिद्धिमाच्या या निवेदनानंतर अनेकांनी तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरही तिच्या समर्थनार्थ कमेंट्स पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वात अफवा आणि गॉसिप ही नवी बाब नाही, परंतु Ridhima Pandit ने अशा चर्चांना कडाडून उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिच्या चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला साथ देत, “तुझं कामच तुझी ओळख आहे, बाकी काही फरक पडत नाही,” असं म्हणत तिला प्रोत्साहन दिलं.
हे पण वाचा .. महेश मांजरेकर “माझ्या आयुष्यातील बापमाणूस” — सिद्धार्थ जाधवचं भावनिक वक्तव्य, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील भूमिकेबद्दल खुलासा









