ADVERTISEMENT

‘प्रेमाची गोष्ट २’: रिधिमा पंडितचा मराठी चित्रपटसृष्टीत पहिला रोमॅंटिक सिनेमा

ridhima pandit marathi priyamachi goshta 2 : हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिधिमा पंडित आता 'प्रेमाची गोष्ट २' चित्रपटातून मराठी सिनेप्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ललित प्रभाकरसोबत तिच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
ridhima pandit marathi priyamachi goshta 2

ridhima pandit marathi priyamachi goshta 2 : हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री रिधिमा पंडित आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ हा दिवाळी सणानिमित्त प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. रिधिमा पंडित या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून तिचे मराठी चित्रपटसृष्टीतले पदार्पण चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.

रिधिमा पंडित हिंदी शो ‘बहु हमारी रजनीकांत’ आणि ‘खतरों के खिलाड़ी’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. तिची सोशल मीडियावरील सक्रीय उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंट यामुळे ती जेन झी प्रेक्षकांमध्येही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि रिल्स नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात, त्यामुळे तिच्या मराठी चित्रपटातील पदार्पणाची अपेक्षा वाढली आहे.

चित्रपटातून नुकताच प्रदर्शित झालेलं रोमॅण्टिक गाणं ‘ये ना पुन्हा’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. रिधिमा आणि ललित प्रभाकर यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.

रिधिमा पंडितने स्वतःच्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगितले, “हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसत असल्यामुळे मला उत्साह आणि थोडी धडधड वाटते. सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं हा माझ्यासाठी खास अनुभव ठरला. ललितसोबत काम करताना खूप मजा आली. एकूणच हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय राहिला आहे, आणि प्रेक्षक नक्कीच माझ्या या नव्या प्रवासाला प्रेम देतील.”

चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, संजय छाब्रिया निर्माते आणि अमित भानुशाली सह-निर्माते आहेत. २१ ऑक्टोबर दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

हे पण वाचा.. लग्नाआधीचा मजेशीर किस्सा: मृणाल दुसानिसची नीरजसाठीची चिठ्ठी!

‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट केवळ मराठी प्रेक्षकांसाठीच नाही तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे. रिधिमा पंडितच्या अभिनयाने आणि ललित प्रभाकरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट उत्साही चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

हे पण वाचा.. “कमळीवर संकट, हृषीचा धडाकेबाज प्रवेश! अनिकाचा कपटी प्लॅन झाला फस?”

ridhima pandit marathi priyamachi goshta 2