ADVERTISEMENT

घटस्फोट झाला, पण नातं तुटलं नाही” राकेश बापट बद्दल रिद्धी डोगरानं काय सांगितलं?

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce : अभिनेत्री रिद्धी डोगरानं राकेश बापट सोबतच्या घटस्फोटानंतरच्या नात्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं असून, आजही दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि परस्पर विश्वास असल्याचं तिनं सांगितलं आहे.
riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce

riddhi dogra on friendship with raqesh bapat after divorce : सध्या Raqesh Bapat हा ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचा शांत, समजूतदार आणि सुसंस्कृत खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. मात्र, बिग बॉसच्या घराबाहेरही त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित एका वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचं कारण ठरलं आहे त्याची एक्स पत्नी अभिनेत्री रिद्धी डोगरानं दिलेली एक मुलाखत.

रिद्धी डोगरानं नुकतीच बालाजी टेलिफिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत Raqesh Bapat सोबतच्या नात्याबद्दल प्रामाणिकपणे मन मोकळं केलं. तिनं सांगितलं की, लग्न तुटलं असलं तरी दोघांनी आपली मैत्री जपण्याचा निर्णय घेतला. “आम्ही एकमेकांसाठी जोडीदार म्हणून योग्य नव्हतो, पण मित्र म्हणून मात्र आम्ही खूप चांगले आहोत,” असं ती ठामपणे म्हणाली.

रिद्धीच्या मते, घटस्फोट हा शेवट नसतो, तर काही वेळा तो आयुष्याला नवी दिशा देणारा निर्णय ठरतो. Raqesh Bapat आणि आपण दोघांनीही समजूतदारपणे हा निर्णय घेतला आणि एकमेकांविषयी मनात कटुता न ठेवता नात्याला मैत्रीचं रूप दिलं, असं तिनं स्पष्ट केलं. आजही दोघे एकमेकांवर विश्वास ठेवतात, एकमेकांची गुपितं जपतात आणि अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात, हे तिनं अभिमानानं सांगितलं.

रिद्धी आणि Raqesh Bapat यांची ओळख ‘मर्यादा : लेकिन कब तक’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, काही वर्षांनंतर दोघांच्या नात्यातील मतभेद वाढले आणि अखेर २०१९ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणत्याही वादाविना, परस्पर संमतीनं घेतल्याचं याआधीही दोघांनी सांगितलं होतं.

घटस्फोटानंतरही हे दोघे अनेक कार्यक्रम, सण-समारंभ आणि वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र दिसतात. सोशल मीडियावर शेअर होणारे त्यांचे फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. या मैत्रीमुळे समाजात नात्यांकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी तयार होत असल्याचंही अनेकांचं मत आहे.

हे पण वाचा.. एकाच वेळी दोन मालिकांत झळकणार स्वप्नील आजगावकर! ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’वर दमदार कमबॅक

दरम्यान, रिद्धी डोगरा आपल्या अभिनय कारकिर्दीत व्यस्त असून चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमधून ती सातत्यानं प्रेक्षकांसमोर येत आहे. दुसरीकडे Raqesh Bapat बिग बॉस मराठीमध्ये किती दूरपर्यंत मजल मारतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र, घटस्फोटानंतरही टिकून राहिलेली त्यांची मैत्री अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

हे पण वाचा.. लक्ष्मी निवास मध्ये मोठा बदल! धनश्री पाटील साकारणार सिंचनाची भूमिका, अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत