reshma shinde akshar kothari rumor reaction : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे (reshma shinde) नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. मालिकेच्या कथानकात नुकताच मोठा ट्विस्ट आलेला असताना, रेश्माने एका मुलाखतीत स्वतःबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे, तिचं नाव अभिनेता अक्षर कोठारी बरोबर जोडणाऱ्या अफवांवरही तिने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
रेश्मा शिंदेने सांगितलं की, काही काळापूर्वी तिच्या आणि अक्षर कोठारी (akshar kothari) च्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. ती म्हणाली, “अक्षर माझा खूप जवळचा मित्र आहे. पण अचानक आमच्याबद्दल लग्नाच्या आणि अफेअरच्या बातम्या पसरल्या. त्या वेळी आमच्या घरच्यांनाही धक्का बसला होता. अशा गोष्टींमुळे वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, पण सुदैवाने तसं काही घडलं नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “ही एक अत्यंत विचित्र अफवा होती. आम्ही दोघेही वेगळ्या नात्यांमध्ये होतो. तरीही काही लोकांनी कल्पना करून कथा तयार केल्या. मला त्याचं हसूच आलं. आमचं लग्न ठरलंय, अफेअर आहे वगैरे गोष्टी मी वाचल्या आणि आश्चर्यचकित झाले.”
रेश्माने मुलाखतीदरम्यान आणखी काही खास गोष्टीही शेअर केल्या. तिला विचारलं गेलं की तिला कोणी कधी फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलं आहे का? त्यावर ती हसत म्हणाली, “कधीच नाही! उलट मीच माझ्या नवऱ्याला प्रपोज केलं होतं. मी स्वतः खूप फिल्मी आहे आणि जेव्हा आमचं नातं पुढे न्यायचं ठरवलं, तेव्हा मीच पुढाकार घेतला.”
आपल्या भीतीबद्दल बोलताना रेश्मा म्हणाली, “मला माझी जवळची माणसं दूर जाण्याची भीती वाटते.” तसेच तिला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल, या प्रश्नावर ती म्हणाली, “हृतिक रोशनसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे.”
हे पण वाचा.. अधिरासारखी…’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरे बोलला खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल म्हणाला.
रेश्मा शिंदेचं हे स्पष्ट आणि प्रामाणिक वक्तव्य तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भावलं आहे. अफवांना उत्तर देतानाही तिने आपला संतुलित आणि शांत स्वभाव दाखवला, हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं आकर्षण आहे.
हे पण वाचा.. खुशबू तावडेने दाखवली सासरची झलक; कोल्हापुरातील घर, गोठा आणि मिसळचा व्ह्लॉग चाहत्यांच्या पसंतीस









