ADVERTISEMENT

रसिका वखारकरचा लग्न काउंटडाऊन सुरू; ‘10 Days To Go’ व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

मराठी अभिनेत्री रसिका वखारकर लवकरच शुभांकर उंबराणीसोबत विवाहबंधनात अडकणार असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या ‘10 Days To Go’ व्हिडीओमुळे तिच्या लग्नाची लगीनघाई सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
rasika wakharkar wedding countdown video

rasika wakharkar wedding countdown video : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली, तर काहींनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली. अशातच आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडले जाणार आहे. छोट्या पडद्यावर आपल्या सहज अभिनयाने ओळख निर्माण करणारी Rasika Wakharkar लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेमधील तिच्या भूमिकेमुळे Rasika Wakharkar घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाची आणि साधेपणाची प्रेक्षकांनी विशेष दखल घेतली. या यशानंतर ती ‘अशोक मा. मा.’ या कलर्स मराठीवरील मालिकेतही झळकली होती. नुकतीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन गेली असली, तरी रसिका सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वामुळे चर्चेत आहे.

काही काळापूर्वीच रसिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. “एक नवीन सुरुवात… Love in the air” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर लवकरच Rasika Wakharkar आणि शुभांकर उंबराणी यांचा साखरपुडा पार पडल्याचं तिने जाहीर केलं. “माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन” असं भावूक कॅप्शन देत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

आता या साखरपुड्यानंतर रसिकाच्या लग्नाची अधिकृत चाहूल लागली आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती “10 Days To Go” असं म्हणताना दिसते. या व्हिडीओमुळे तिच्या लग्नाचा काउंटडाऊन सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून येत्या २२ किंवा २३ जानेवारीदरम्यान तिचा विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या व्हिडीओमध्ये Rasika Wakharkar लग्नाच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेली दिसते. साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी, ज्वेलरी निवडताना घेतलेले क्षण, तसेच संगीत समारंभासाठी सुरू असलेला नृत्य सराव हे सगळं तिने या व्हिडीओतून चाहत्यांसमोर आणलं आहे. “लग्नाचा काउंटडाऊन सुरू झाला आहे” असं कॅप्शन देत तिने #WeddingCountdown आणि #BrideToBe हे हॅशटॅग वापरले आहेत.

हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये तन्वी कोलतेची धडक एन्ट्री, ‘लक्ष्मी निवास’ची कूल सून थेट बिग बॉसच्या घरात

रसिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या आयुष्यातील या नव्या अध्यायासाठी सगळेच उत्सुक आहेत. अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातही Rasika Wakharkar सध्या आनंदाच्या शिखरावर असून, तिच्या लग्नाकडे संपूर्ण मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे पण वाचा.. शिव ठाकरे विवाहबंधनात; अचानक शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का

rasika wakharkar wedding countdown video