ADVERTISEMENT


“अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको…” रसिका वाखरकरची स्पष्ट भूमिका; होणाऱ्या नवऱ्याबद्दल खास खुलासा

rasika vakharkar lagn sakharpuda : लोकप्रिय अभिनेत्री Rasika Vakharkar हिने अलीकडेच तिच्या साखरपुड्याची आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली. मात्र, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलताना तिने स्पष्ट सांगितलं – "मला अभिनय क्षेत्रातला जोडीदार नको होता." शुभंकर उमराणी या उद्योगक्षेत्रातील तरुणाशी तिचं लग्न ठरत असून या नात्यामागची कहाणी रसिकाने मनमोकळेपणाने सांगितली.
rasika vakharkar lagn sakharpuda

rasika vakharkar lagn sakharpuda : मराठी मालिकाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री Rasika Vakharkar सध्या चर्चेत आहे. ‘अशोक मा.मा.‘ या मालिकेत भैरवीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. नुकताच तिचा शुभंकर उमराणी याच्याशी साखरपुडा झाला असून या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव झाला.

रसिकाने एका मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलताना सांगितलं, “मी ज्या क्षेत्रात काम करते, त्याला समजून घेणारा आणि आदर करणारा जोडीदार हवा होता. पण माझी इच्छा अशी होती की, तो स्वतः या क्षेत्रातील नको. शुभंकरचा कौटुंबिक व्यवसाय आहे आणि तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत काम करतो. याच गोष्टीमुळे मला वाटलं की तो माझ्यासाठी योग्य आहे.”

रसिकाने पुढे सांगितलं की, शुभंकर आणि त्याच्या कुटुंबीयांना अभिनयाविषयी कुतूहल आहे. ते तिचं काम पाहतात, कौतुक करतात आणि नाटक-सिनेमांविषयी आवडही व्यक्त करतात. या पाठिंब्यामुळे तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधण्याचा आत्मविश्वास मिळतोय.

हे पण वाचा.. देवाच्या बाजूला माझा फोटो; Bhau Kadam यांनी सांगितली चाहतीची अनोखी आठवण

७ सप्टेंबर रोजी झालेला साखरपुडा रसिकासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. सेटवर सगळ्यांनी केक कापून छोटं सेलिब्रेशनही केलं. या वेळी तिने सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ही आनंदवार्ता सांगितली. तेव्हा सराफ यांनी तिला सल्ला दिला की, “लग्नानंतरही काम सोडायचं नाही. तुझ्याकडे असलेली कला ही अमूल्य आहे, ती कायम जपली पाहिजे.” रसिकानेही हा सल्ला मनापासून स्वीकारल्याचं सांगितलं.

लग्नाची तारीख अजून ठरलेली नसली तरी रसिकाने स्पष्ट केलं की साखरपुड्यानंतर थोड्याच काळात विवाहसोहळा पार पडेल. चाहत्यांना मात्र तिच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता लागली आहे.

हे पण वाचा.. “सुंदरी गाण्यावर थिरकले ऐश्वर्या आणि अविनाश नारकर; चाहत्यांनी केमिस्ट्रीवर दिल्या गोड प्रतिक्रिया”

rasika vakharkar lagn sakharpuda