ADVERTISEMENT

राज ठाकरे यांच्याकडून महेश मांजरेकरांना सलाम; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाचं कौतुक करत म्हणाले, “महाराष्ट्राबद्दलचं भावविश्व जपणारं धाडस”

Raj Thackeray Yani Mahesh Manjrekaranvar yach kel Kautuk : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या ट्रेलर सोहळ्यात Raj Thackeray यांनी स्वतः उपस्थित राहून दिग्दर्शकाचं मनापासून कौतुक केलं. “महाराष्ट्राच्या संवेदनांना स्पर्श करणारा सिनेमा” अशा शब्दांत त्यांनी महेश मांजरेकरांच्या कार्याचा गौरव केला.
Raj Thackeray Yani  Mahesh Manjrekaranvar yach kel Kautuk

Raj Thackeray Yani  Mahesh Manjrekaranvar yach kel Kautuk : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उमेदीने चर्चेत आलेल्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा भव्य ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती, त्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते Raj Thackeray यांच्या उपस्थितीने. त्यांनी या प्रसंगी दिग्दर्शक Mahesh Manjrekar यांचं मनापासून कौतुक करत मराठी सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं.

या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “ट्रेलर पाहताना मला असं वाटलं की महेश खरंच ‘झपाटलेला’ आहे. तो ज्या विचारांनी सिनेमा करतो ते विलक्षण आहेत. तो नेहमी भव्य विचार करतो, भव्य दृष्टीने सिनेमा पाहतो. हीच आमच्यातील एक समानता आहे.” त्यांनी विनोदी पद्धतीने म्हटलं की, “महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला २’ हा सिनेमा महेश मांजरेकरांवरच बनवायला हवा.”

राज ठाकरे यांनी पुढे बोलताना ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या पहिल्या चित्रपटाची आठवण करून दिली. “पहिला सिनेमा मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरी प्रेक्षकांसाठी होता. मात्र हा नवा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठी आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या वेदना आणि आत्महत्यांसारखा जळता मुद्दा उचलून तो पडद्यावर आणणं हे फक्त संवेदनशील मनाचं काम असतं,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी महेश मांजरेकरांच्या या विचारशील दृष्टिकोनाचं मनापासून कौतुक केलं.

महेश मांजरेकर यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांवर नेहमीच खोल प्रभाव टाकला आहे. “हिंदी चित्रपटसृष्टीत यश चोप्रा जसे ओळखले जातात, तसेच मराठीत महेश मांजरेकर आहेत,” असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी महेश यांना विशेष मानाचा मुजरा दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक सिनेमे बनले आणि त्यांना लोकांनीही डोक्यावर घेतलं. पण महेश यांचा हा सिनेमा भूतकाळ आणि वर्तमान यांचा संगम दाखवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हा सिनेमा नक्कीच डोक्यावर घेईल,” असं ते म्हणाले.

पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनीच केलं आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, सिद्धार्थ बोडके, मंगेश देसाई, शशांक शेंडे, पृथ्वीक प्रताप, पायल जाधव आणि त्रिशा ठोसर यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत.

हे पण वाचा.. प्राजक्ता माळीची ‘मना’चे श्लोक चित्रपटाला पाठिंबा; प्रदर्शनावरील वादावर तीव्र प्रतिक्रिया

या ट्रेलर सोहळ्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सिनेमाबद्दलचा सकारात्मक माहोल निर्माण झाला आहे. मराठी चित्रपटप्रेमींना आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे यांचं कौतुक आणि प्रेक्षकांचा उत्साह या दोन्हीमुळे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमा मराठी सिनेसृष्टीत एक मोठी नोंद करेल, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे

हे पण वाचा.. “लोक म्हणाले मी इंडस्ट्री सोडली…” मयुरी वाघने दिलं अफवांना उत्तर, सांगितली खरी कारणं!

Raj Thackeray Yani  Mahesh Manjrekaranvar yach kel Kautuk