raj hanchanale snai chaughade marathi malika jay khanolkar : ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणारी ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीची कथा आणि प्रभावी व्यक्तिरेखा देण्याचा प्रयत्न या मालिकेतून होताना दिसतो. या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अभिनेता Raj Hanchanale. याआधी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. आता मात्र तो पूर्णपणे वेगळ्या अंदाजात छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
या मालिकेत Raj Hanchanale साकारत असलेला जय खानोलकर हा स्वभावाने कणखर, शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ता आहे. वरकरणी थोडासा रागीट आणि अॅटिट्युड असलेला वाटणारा जय मनाने मात्र अत्यंत संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात आजी, आई आणि बहीण या तीन स्त्रियांनाच विशेष स्थान आहे. कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत ठेवणे आणि भावनांमध्ये अडकून न पडणे, हा त्याचा ठाम स्वभाव आहे. स्वतःच्या मेहनतीवर उभं राहिलेलं त्याचं विश्व त्याला आत्मविश्वास देतं; मात्र तो गर्विष्ठ नाही.
मालिकेतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जयच्या ऑफिसमध्ये महिलांना काम करण्याची परवानगी नसणे. या निर्णयामागे नेमकं कारण काय, त्याच्या भूतकाळात कोणती गुपितं दडलेली आहेत, हे कथानक पुढे सरकत असताना उलगडत जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा .. शिमग्याला गावी जाता आले नाही; जान्हवी तांबटच्या डोळ्यांत पाणी, नेटकऱ्यांनी दिला धीर
Raj Hanchanale ने या भूमिकेसाठी झालेल्या ऑडिशन प्रक्रियेबद्दल सांगताना स्पष्ट केले की, यावेळी निवड प्रक्रिया खूप काटेकोर होती. सुरुवातीला त्याने घरातून ऑडिशन व्हिडीओ पाठवला. त्यानंतर सेटवर अनेक फेऱ्यांमध्ये सहकलाकारांसोबत स्क्रीन टेस्ट देण्यात आल्या. पूर्वी एक-दोन ऑडिशनमध्ये भूमिका मिळायची; पण या वेळी चार-पाच राऊंड पार करावे लागले. सुरुवातीला थोडी शंका वाटली, मात्र शेवटी योग्य कलाकार निवडण्यासाठी घेतलेला हा प्रयत्न असल्याचे त्याला जाणवले.
जय खानोलकरसारखी प्रभावी व्यक्तिरेखा साकारताना Raj Hanchanale विशेष मेहनत घेत आहे. चालण्याची ढब, बोलण्याचा टोन, उभं राहण्याची पद्धत, स्वॅग आणि अॅटिट्युड यावर तो दिग्दर्शकांसोबत चर्चा करून काम करत आहे. याआधीच्या ग्रामीण आणि भावनिक छटांच्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा पूर्णतः वेगळी असल्याने त्याच्यासाठी हा नवा अनुभव ठरत आहे.
हे पण वाचा .. सावळ्याची जणू सावली मध्ये ‘शिवा’ फेम मानसी सुरेशची धमाकेदार एन्ट्री
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः काही संवाद आणि जयची दमदार एन्ट्री सोशल मीडियावर चर्चेत आहे. Raj Hanchanale बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, या नव्या भूमिकेत तो कसा दिसेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
raj hanchanale snai chaughade marathi malika jay khanolkar
‘सनई चौघडे’ ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित होणार आहे. दमदार कथा आणि Raj Hanchanale चा प्रभावी अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









