ADVERTISEMENT

लग्नाची घाई आणि मतभेद…म्हणून ब्रेकअप प्रियदर्शिनी इंदलकरचा स्पष्ट खुलासा

priyadarshini indalkar breakup reason : प्रियदर्शिनी इंदलकर हिने पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक नात्याबद्दल मोकळेपणाने बोलत ब्रेकअपचं नेमकं कारण सांगितलं आहे. लग्नाबाबतची वेगळी मतं आणि Compatibility अभावामुळे हे नातं संपल्याचं तिने स्पष्ट केलं.
priyadarshini indalkar breakup reason

priyadarshini indalkar breakup reason : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Priyadarshini Indalkar सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या सहज, विनोदी अभिनयामुळे “पुण्याची विनम्र अभिनेत्री” अशी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियदर्शिनीने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक प्रामाणिक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या प्रियदर्शिनीला चाहत्यांकडून तिच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिप स्टेटसबद्दल सतत प्रश्न विचारले जातात. अखेर तिने स्वतःच या सगळ्यावर स्पष्ट भूमिका मांडली.

प्रियदर्शिनी इंदलकर सध्या अभिजीत आमकरसोबतच्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने ती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये सहभागी झाली होती. या संवादात प्रणितने तिला थेट “तू सिंगल आहेस का?” असा प्रश्न विचारला. यावर प्रियदर्शिनीने कोणताही आडपडदा न ठेवता ‘हो’ असं उत्तर दिलं. पुढे बोलताना तिने गेल्या वर्षी, एप्रिल २०२५ मध्ये आपलं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं.

ब्रेकअपचं कारण सांगताना Priyadarshini Indalkar म्हणाली की, त्यांच्या नात्यात Compatibility राहिली नव्हती. कोणीही Toxic नव्हतं, मात्र परिस्थितीमुळे नातंच तसं बनत गेलं. “तो किंवा मी Toxic नव्हतो, पण आमचं रिलेशनशिप हळूहळू Toxic झालं,” असं ती स्पष्टपणे म्हणाली. या ब्रेकअपचा निर्णय स्वतःचाच होता, हेही तिने ठामपणे सांगितलं.

लग्नाबाबत असलेली मतभिन्नता हे मुख्य कारण असल्याचं प्रियदर्शिनीने नमूद केलं. तिचा जोडीदार वयाने मोठा असल्यामुळे त्याला लवकर लग्न करायचं होतं, तर स्वतःला अजून घाई नसल्याचं तिने स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून वाद वाढत गेले आणि अखेर नातं टिकवणं कठीण झालं.

या संवादादरम्यान प्रियदर्शिनी इंदलकरने एक मजेशीर किस्साही शेअर केला. काही वर्षांपूर्वी एका चाहत्याने तिला थेट ई-मेलद्वारे लग्नासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या ई-मेलमध्ये त्याने स्वतःचं वय, नोकरी, उत्पन्न, प्रॉपर्टी आणि लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल, याची सविस्तर माहिती दिली होती, असं ती हसत सांगते.

हे पण वाचा.. २२ व्या वर्षी प्रेमात पडली, ७ वर्षांचा वयाचा फरक तरीही निर्णय पक्का; ज्ञानदा रामतीर्थकरने सांगितली खरी लव्हस्टोरी

दरम्यान, Priyadarshini Indalkar आणि अभिजीत आमकर यांचा ‘लग्नाचा शॉट’ हा सिनेमा येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नातेसंबंध, लग्न आणि भावनांचा वेगळा दृष्टिकोन मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रियदर्शिनीचा हा प्रामाणिक आणि स्पष्ट खुलासा चाहत्यांमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

हे पण वाचा.. अर्णव-ईश्वरीच्या नात्यातील गैरसमज दूर होणार? तू ही रे माझा मितवा च्या नव्या रोमँटिक प्रोमोने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

priyadarshini indalkar breakup reason