ADVERTISEMENT

Priya Berde Kajalmaya Serial Entry १० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन! ‘काजळमाया’ मालिकेत प्रिया बेर्डे निभावणार खास भूमिका

Priya Berde मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘स्टार प्रवाह’वरील नवीन मालिका ‘काजळमाया’मधून त्या ‘कनकदत्ता’ या रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असून, तब्बल १० वर्षांनंतर त्यांचा टेलिव्हिजनवरील पुनरागमन होणार आहे.
Priya Berde Kajalmaya Serial

Priya Berde Kajalmaya Serial मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रिया बेर्डे या नावाला कोण ओळखत नाही! अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. आता या अनुभवी अभिनेत्रीने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘काजळमाया’ या नवीन थ्रिलर मालिकेत प्रिया बेर्डे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

काजळमाया’ मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या तिघांसोबतच प्रिया बेर्डे यांची भूमिका मालिकेत विशेष ठरणार आहे. त्या ‘कनकदत्ता’ नावाच्या गूढ व्यक्तीरेखेची भूमिका साकारत आहेत — जी आपल्या चेटकीण वंशाचा अभिमान बाळगणारी आणि आपल्या मुलीच्या महत्त्वाकांक्षेस प्रोत्साहन देणारी स्त्री आहे.

ही मालिका पर्णिका नावाच्या चेटकीणीभोवती फिरते, जी रुपाने सुंदर पण मनाने निर्दयी आहे. तिला फक्त तिचा चेटकीण वंश पुढे नेण्याचं ध्येय आहे आणि त्यासाठी ती काहीही करण्यास तयार असते. तिची आई कनकदत्ता मात्र या सर्वामागील शक्ती आहे — जिच्या सुडाच्या भावनेमुळे संपूर्ण कथानक अधिक तीव्र बनतं.

‘कनकदत्ता’ या भूमिकेविषयी बोलताना प्रिया बेर्डे Priya Berde म्हणाल्या, “माझ्या कारकिर्दीत मी अनेक भूमिका साकारल्या, पण अशी व्यक्तिरेखा पहिल्यांदाच हाताळते आहे. कनकदत्ता पाहताच एक वेगळं थरारक वातावरण जाणवतं. ती संमोहनविद्येत निपुण असून तिच्या प्रत्येक कृतीत एक रहस्य दडलेलं आहे. ही भूमिका मला अभिनयाच्या नव्या पैलूंना उजाळा देणारी ठरणार आहे.”

ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर,शेतात राबणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे चर्चेत !

‘काजळमाया’ ही मालिका रहस्य, तंत्रविद्या आणि भावना यांचं अनोखं मिश्रण सादर करणार आहे. २७ ऑक्टोबरपासून दररोज रात्री १०.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर ही मालिका प्रसारित होणार आहे. दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर परतणाऱ्या प्रिया बेर्डे यांच्या अभिनयाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.