ADVERTISEMENT

प्रिया मराठेच्या आठवणीत भावुक झाला अभिजीत खांडकेकर म्हणाला आजारपणातही ती करत होती काम

priya marathe Sathi abhijeet khandkekar bhavuk : कॅन्सरशी झुंज देत प्रिया मराठेचं निधन झालं. तिच्या आठवणी शेअर करताना abhijeet khandkekar भावुक झाले. आजारपणातही प्रियाने शेवटपर्यंत काम सुरू ठेवलं होतं.
priya marathe Sathi abhijeet khandkekar bhavuk

priya marathe Sathi abhijeet khandkekar bhavuk :  मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्व शोकाकुल आहे. ३१ ऑगस्ट रोजी कॅन्सरशी झुंज देत तिचं आयुष्य संपलं. प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री शेवटच्या दिवसापर्यंत अभिनय क्षेत्राशी जोडलेली राहिली. प्रियाच्या या प्रवासाबद्दल तिचा सहकलाकार abhijeet khandkekar यांने एक हृदयस्पर्शी आठवण शेअर केली आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाले, “प्रिया जेव्हा आजारी असल्याचं प्रथम समजलं, तेव्हा ती खूप घाबरली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट सुरू करायची वेळ आली होती. त्या क्षणी मी तिचा आधार बनलो. तीने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की सेटवर कोणालाही याची कल्पना नको. तिच्या दमल्यामुळे किंवा सुट्ट्यांमुळे लोक अनेक तर्क लावायचे, पण खरी गोष्ट फारच थोड्यांना माहिती होती.”

अभिजीत पुढे म्हणाले की, “प्रिया खूप कणखर होती. उपचार सुरू असतानाही ती मालिकेतलं शूटिंग, नाटकांचे प्रयोग करत राहिली. ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील तिची ‘मोनिका’ ही भूमिका जोरदार संवादांनी भरलेली होती. पण जेव्हा ट्रीटमेंटमुळे तब्येत खालावत गेली, तेव्हा दोन वाक्य बोलणंही तिच्यासाठी अवघड झालं होतं. तरीही ती सेटवर स्वतः गाडी चालवत यायची, शूटिंग करायची. अशी जिद्द पाहून खरंच मन हेलावून जायचं.”

हे पण वाचा.. ‘पारू’ मालिकेतून सुनील बर्वेची एक्झिट? खास पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली

प्रिया शेवटच्या दिवसांपर्यंत तिच्या कलेशी प्रामाणिक राहिली. तिच्या आठवणी सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक झाले आणि म्हणाले, “आज वाटतंय की प्रिया अजून थोडा वेळ आमच्यात असती तर किती बरं झालं असतं. पण तिच्या यातना संपल्या, यातून ती मुक्त झाली हेच योग्य होतं कदाचित.”

प्रिया मराठेच्या जाण्यानं केवळ कुटुंबच नाही तर तिचे सहकलाकार, प्रेक्षक आणि संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. तिची कला, तिचा जिद्दीचा प्रवास आणि अभिजीत खांडकेकरांसारख्या सहकलाकारांनी सांगितलेल्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील.

हे पण वाचा.. मिस इंदौर झाली मिसेस अर्णव! अभिजीत आमकरनं शेअर केले लग्नाचे खास क्षण