मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिच्या निधनाने संपूर्ण मराठी उद्योगावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. ३१ ऑगस्ट रोजी मीरारोड येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने मराठी मालिकांचे चाहते, सहकलाकार आणि जवळचे मित्र-परिवार हळहळ व्यक्त करत आहेत.
Priya Marathe च्या आठवणीत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या. त्यातच अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने तिच्यासाठी लिहिलेलं पत्र विशेष चर्चेत आलं आहे. या पत्रातून त्याने प्रियाचा संघर्ष, तिची जिद्द आणि तिचं निरागस व्यक्तिमत्त्व अधोरेखित केलं आहे.
Aastad Kale ने हे पत्र प्रियाच्या पती शंतनूला उद्देशून लिहिलं असलं तरी त्यातील प्रत्येक शब्द प्रियाला वाहिलेला आहे. शंतनूविषयी आदर व्यक्त करताना तो लिहितो – “तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याचं दुःख आहे. पण हे पत्र मी प्रियाला लिहितोय. तिच्यापर्यंत पोहोचवलंस तर खूप बरं वाटेल.”
Priya Marathe बद्दल बोलताना Aastad Kale लिहितो, “तू सुरुवातीला किती कष्ट घेतलेस हे जवळून पाहिलं नाही, पण ऐकलं आहे. त्या कष्टांचं फळ तुला मिळालं आणि तरीसुद्धा तुझ्या स्वभावात बदल झाला नाही. हे अवघड असतं गं प्रिया, भल्याभल्यांना जमत नाही.”
Priya Marathe च्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना Aastad Kale पुढे म्हणतो, “मस्तीखोर, संवेदनशील, हसतमुख असं तुझं रूप सगळ्यांनी पाहिलं. साधारण २० वर्षं या क्षेत्रात काम करूनही तुझ्याबद्दल कुणी वाईट बोलताना कधी ऐकलं नाही. हे असं आयुष्य जगणं खरंच कठीण असतं.”
Priya Marathe च्या आजाराशी लढाईवर बोलताना आस्तादने आपल्या भावना व्यक्त केल्या. “हा नीच आजार जडल्यानंतर तू काही काळ खचली असशील. पण त्यानंतर दिसलीस ती ताकदीनं उभी राहिलेली प्रिया. एकदा मागे ढकललंस त्याला, पण पुन्हा परत आल्यावरही लढलीस. वर्षभर यातना सहन करणं किती कठीण होतं. शरीराने तू एकटीच भोगलं आणि तरीही कुठून आणलीस गं ही ताकद?”
हे पण वाचा.. प्रिया मराठेच्या निधनानंतर Abhijeet Khandkekar भावुक; “शंतनू, तू ज्या धीराने…” म्हणत लिहिली आठवणींची पोस्ट
पत्राच्या शेवटी Aastad Kale प्रियाबद्दल लिहितो, “तुझ्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिलीच. पण माणूस म्हणून तू जे-जे केलंस त्याला तोड नाही. खूप शिकवलंस प्रिया, हसवलंस. तेवढंच आठवून ठेवायचंय… THANK YOU प्रिया.”
Priya Marathe ने ‘चार दिवस सासूचे’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बड़े अच्छे लगते हैं’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं होतं. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली होती. अल्पशा आयुष्यात तिने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली आणि तिच्या आठवणींनी मराठी कलाविश्व कायमस्वरूपी समृद्ध झालं आहे.
हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ फेम Jui Gadkari ची नवी सुरुवात; सेटवरून करत आहे मास्टर्स इन एंटरप्रेन्युरशिपचा अभ्यास









