ADVERTISEMENT

सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया : Priya Bapat च्या ग्लॅमरस फोटोशूटची जोरदार चर्चा

Priya Bapat सध्या ‘अंधेरा’ वेबसीरिज आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यासोबतच तिच्या लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Priya Bapat

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिभावान अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat)  सध्या तिच्या कामगिरीसोबतच स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत आली आहे. एकीकडे ‘अंधेरा’ ही वेबसीरिज आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आहे, तर दुसरीकडे तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Priya Bapat ने नुकतेच काही खास फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सिल्व्हर रंगाच्या आकर्षक जंपसूटमध्ये, कानात मोठ्या इअररिंग्स आणि हाय पोनीटेलसह ती उठून दिसत आहे. सुवर्ण रंगाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या फोटोशूटमध्ये प्रियाने वेगवेगळ्या हटके पोझ दिल्या आहेत. “सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया” असे कॅप्शन देत शेअर केलेल्या या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांकडून कौतुकाच्या आणि प्रेमाच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.

Priya Bapat केवळ फॅशन आणि सौंदर्यामुळेच नव्हे, तर तिच्या दमदार अभिनयामुळेही नेहमीच चर्चेत राहते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंधेरा’ या हिंदी हॉरर वेबसीरिजमध्ये तिने पोलिसाची भूमिका साकारली असून तिच्या या परफॉर्मन्सचं कौतुक होत आहे. त्यानंतर ती लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे, आणि या जोडीला प्रेक्षकांकडून कायमच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

चित्रपट आणि वेबसीरिजमधील भूमिकांबरोबरच Priya Bapat चा हा नवीन ग्लॅमरस अवतार चाहत्यांसाठी एक वेगळाच सरप्राईज ठरला आहे. अभिनयाबरोबर फॅशनमध्येही तिची स्टाईल स्टेटमेंट नेहमीच ट्रेंडमध्ये राहिली आहे.

हे पण वाचा.. मी खरंच नशीबवान! Adinath Kothare ने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; भक्तीत झाला तल्लीन

Priya Bapat च्या फिल्मी प्रवासावर नजर टाकली तर ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास २’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारख्या हिंदी चित्रपटांतूनही प्रिया बापटने आपली अभिनयक्षमता दाखवून दिली आहे.

ग्लॅमर, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर Priya Bapat ने मराठीसह हिंदीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे हे नवीन फोटोशूट पुन्हा एकदा दाखवून देतं की, ती केवळ पडद्यावरच नाही तर कॅमेऱ्यासमोर कोणत्याही लूकमध्ये आत्मविश्वासाने झळकते.

हे पण वाचा.. “‘छावा’सारखी मोठी संधी पुन्हा यावी! Santosh Juvekar साठी आईची गणरायाकडे खास प्रार्थना”

Priya Bapat इंस्टाग्राम पोस्ट..